आंबेगाव तालुक्यात 2 अल्पवयीन सख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार, बलात्काराचे केलं चित्रीकरण

| Published : Jun 10 2024, 03:09 PM IST / Updated: Jun 10 2024, 03:23 PM IST

Molestation

सार

अल्पवयीन मुलांना बालसुधारगृह तर इतर तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे

 

मंचर: दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बलात्काराचे चित्रीकरण करण्यात आले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दोन अल्पवयीन सख्या मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुली घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन अल्पवयीन मुले तसेच दोघे जण हे घरी आले. त्यांनी या बहिणीवर बलात्कार केला. सदर अल्पवयीन मुलींनी विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

अल्पवयीन मुलगा बलात्कार करत असताना एकाने त्याच्या जवळील मोबाईलमधून घराबाहेरच्या खिडकीतून शूटिंग केले. दुसऱ्याने एका पीडीतेला सदर व्हिडिओ दाखवून दुसऱ्या पीडीतेला पुलाजवळ पाठवून दे असे सांगितले व तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तीन जणांसह दोन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलमाखालीही गुन्हा दाखल झाला आहे. यातील अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तर तीन जणांना यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण फुगे करत आहेत.

आणखी वाचा :

केंद्रात नरेंद्र मोदी सरकारने केली 'या' फाईलवर स्वाक्षरी, शेतकऱ्यांसाठी कोणता घेतला निर्णय?