Lalit Patil Drug case : पुणे पोलीस दलातून 2 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशिराने दिल्याने कारवाई

| Published : Jul 04 2024, 04:12 PM IST

pune lalit patil drug case
Lalit Patil Drug case : पुणे पोलीस दलातून 2 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशिराने दिल्याने कारवाई
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Lalit Patil Drug Case : ललित पाटील पळून गेल्याची माहिती दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षास तब्बल तीन तास उशीरा दिल्याची माहिती समोर आली आहे.

 

पुणे : ललित पाटील ससून रुग्णालयातून पलायन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे दोघे ललित सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाचे कारण देत ड्रग्स रॅकेट चालवत होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्स सापडले होते. त्यानंतर हे सगळे मोठे ड्रग्स रॅकेट पुढे आले. या रॅकटेचा तपास करताना बड्या लोकांचा हात असल्याचे समोर आले. त्यानंतर सगळ्यांची कसून चौकशी सुरु झाली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते आणि सहा जणांना निलंबित करण्यात आले होते. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी दोन कर्मचारी घेऊन जाणार होते. मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एवढच नाही तर नियंत्रण कक्षास ही माहिती तब्बल तीन तास उशीरा देण्यात आली.

बडतर्फ दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलीस मुख्यालयातील या दोन्ही कर्मचाऱ्यांना आता सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षास माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते. परंतु या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कळवले नाही, चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.

ललित पाटील प्रकरणी तब्बल 3150 पानांचे चार्जशीट

ललित पाटील प्रकरणात अनेल खुलासे समोर येत आहे. ललित पाटील आणि त्याच्यासह 15 जणांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3150 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे चार्जशीट पुणे पोलिसांनी कोर्टात सादर केले.

आणखी वाचा

Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू