सार

तब्बल 11 वर्षांनी आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.

 

पुणे : (Dr. Narendra Dabholkar) अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल जाहीर करण्यात आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं असून दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही असे कोर्टाने म्हटलं. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत. यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

हत्याप्रकरणी तिघे निर्दोष तर दोघे दोषी

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी ५ आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला असून वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. मात्र सुटलेले आरोपी आहेत त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास चुकीच्या दिशेनं, नेमकं काय घडलेलं?

दिवसाढवळ्या घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेनं सुरु होता. या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता, तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. सीबीआयकडून देखील या प्रकरणात चुकीचा तपास झाल्याचं समोर आलं. कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होती सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली.

कॉम्रेड पानसरे, एम एन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एआयटी करुन करण्यात येत होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आलं की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडलं. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही.

दाभोलकरांची हत्या कशी झाली?

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता. नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यात मॉर्निंग वॉक गेले होते. मॉर्निंग वॉक ओटोपून घरी जात असताना पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे अशी मारेकऱ्यांची नावं असल्याचं पुढे तापासातून समोर आलं.