सार

नीट शिक्षकाचा विद्यार्थिनीसोबतचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून, शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय आहे?

पेनड्राईव्ह प्रकरण काही महिन्यांपूर्वी मोठा गाजले होते हे तुम्हाला आठवत असेल. वेळोवेळी पेनड्राईव्ह, सीडी असे शब्द कानावर पडत असतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीसोबत जीवशास्त्र शिकवणारा साहिल सिद्दिकी नावाचा शिक्षक या प्रकरणात सापडला आहे. तेथील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे. बाथरूममध्ये विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करताना तो आढळून आला असून, ही दृश्ये पेनड्राईव्हमध्ये कोणीतरी पोलिसांना पाठवल्याने शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरच्या काकडेओ येथील आय अँड आय कोचिंगमध्ये जीवशास्त्र शिकवणाऱ्या साहिल सिद्दिकी या शिक्षकाला रविवारी पोलिसांनी अटक केली. नीट आकांक्षी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. कोचिंग सेंटरचे संचालक आशिष श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी, कोचिंग सेंटरमध्ये साहिलच्या नावाचा एक लिफाफा आला होता. तो बंद लिफाफा आशिष श्रीवास्तव यांच्या हाती लागला. आत एक पेनड्राईव्ह होती आणि ती लॅपटॉपला जोडल्यावर, कोचिंगच्या आवारात साहिल विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करताना दिसत असलेले सीसीटीव्ही फुटेज दिसले. सुमारे दहा मिनिटे बाथरूममध्ये विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करताना तो दिसत आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये विद्यार्थिनी शिक्षकासोबत सहज असल्याचे पाहून अनेकांनी यात विद्यार्थिनीचीही चूक असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थिनी शिक्षकाला सहजपणे साथ देत असल्याचे दिसत असल्याचे बहुतेकांचे मत आहे. मात्र अशा प्रकरणांमध्ये केवळ शिक्षकांनाच शिक्षा होणे चुकीचे असल्याचे अनेक जण म्हणत आहेत.

View post on Instagram