सार
Worli Heat And Run Accident : मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ रविवारी सकाळी हिट अँड रनची घटना घडली.
Worli Heat And Run Accident : मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ रविवारी सकाळी हिट अँड रनची घटना घडली. पुण्यातील हिट अँड रन केसने संपूर्ण देशाला हादरा दिल्यानंतर आता मुंबईतल्या वरळीतून हिट अँड रन च्या घटनेने मुंबई हादरली आहे. यात एका महिलेने तिचे प्राण गमावले आहेत. तर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी कार चालक शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा असल्याचं समोर आलं आहे. सध्या मिहीर शहा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर वडील राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या वरळी हीट अँड रन प्रकरात नवनवे खुलासे होत आहेत. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील एका बारमध्ये मद्यप्रशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लाँग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. प्रवासादरम्यान तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉलजवळ अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर शहाने मद्यप्रशन केले होते, अशी माहिती समोर आली. याबाबत आता वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
बार मालकाने काय सांगितले?
वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी माहिती दिली मिहीर शहा शनिवारी रात्री 11.08 वाजता चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून बारमध्ये आला होता. त्यांच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती आणि बिल भरल्यानंतर रात्री 1.28 ला मर्सिडीजला कारमधून बाहेर निघून गेले. सर्वांनी एक एक बिअर प्यायली, त्यावेळी चौघेही नॉर्मल होते, ते मर्सिडीजमध्ये आले आणि मर्सिडीजमध्ये निघाले, घटना बीएमडब्ल्यूमध्ये घडली.
पोलिसांकडून सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त
पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला आहे. पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती आम्ही दिली आहे. मिहिर शाहचे बिल 18 हजार 730 होते, बिल त्याच्या मित्राने भरले होते, मिहिरचे ओळखपत्र तपासले आणि एंट्री दिली गेली, तो 28 वर्षांचा आहे, असे बार मालक म्हणाले.
आणखी वाचा :