कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावात १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी शेतात आढळून आला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर: बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापले आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना शहरात घडली आहे. कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरातील धक्कादायक घटना आहे. पीडित मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या 10 वर्षांची ही मुलगी बुधवारी दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर गुरुवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर अधिक माहिती समोर येईल.

या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस अधीश्रक महेंद्र पंडित हे घटनास्थळी दाखल झाले असून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत.

एकीकडे गुरुवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये गुरुवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या शिये गावात मात्र घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असू श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू असून यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा पोलिसांना दणका, शाळा प्रशासनावरही सवाल