जळगावात सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचे सोने लंपास

| Published : May 20 2024, 04:58 PM IST

CRIME SENCE

सार

जळगावात सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा घातल्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने लुटून नेले असून यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

 

जळगाव शहरात सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर आज पहाटेच्या सुमारास दरोडा घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना घडली. यामुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दरोडा घालणारे सहा दरोडे खोर हे सराफ बाजारातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले झाले आहे. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये पहाटेच्या वाजताच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील शोरूम मधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.

सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत दरोडा

यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे सोने बचावले आहे. दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी दुकानाबाहेरील सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक देऊन आणि जिवे मारण्याची धमकी देत गप्प केल्याचे दुकान मालक सौरभ कोठारी यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.