सार

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता काही दिवसांनी दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बुरारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला ही धमकी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता काही दिवसांनी दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बुरारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला ही धमकी देण्यात आली आहे. या दोन्ही हॉस्पिटलला धमकीचे ई-मेल आले आहेत. पोलीस दोन्ही रुग्णालयांतील घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मंगोलपुरी पोलिसांनी सांगितले की, बॉम्ब निकामी पथक, अग्निशमन दल आणि इतर पथकांनी व्यापक शोध घेतल्यानंतरही कोणतेही उपकरण सापडले नाही. गेल्या आठवड्यात दिल्ली आणि गुजरातमधील अहमदाबाद येथील शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, ज्या फसव्या होत्या.