Pune Crime News : पुण्यात बंदूकबाजांची झाडाझडती, तरीही सलग चौथ्या दिवशीही गोळीबार कसं काय ?

| Published : Apr 19 2024, 10:48 AM IST

Jammu And Kashmir Shooting

सार

पुण्यात बंदूकबाजांची पुणे पोलिस आयुक्तांनी झाडाझडती घेतली होती.या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये कमी होण्याच्या ऐवजी वाढ झाली आहे.हडपसर, जंगलीमहाराज रस्ता,सिंहगड आणि येरवडा येथे जुन्यावादातून गोळीबाराची घटना घडली आहे.

Pune Crime News :  अभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर पुणे पोलिसांनी सतर्कता म्हणून शहरातील बंदूकबजांची झाडाझडती घेत सक्त तंबी दिली होती. तरीही शहरात सलग चौथ्या दिसवाशी गोळीबाराच्या घटना घडताना दिसत आहेत. यामुळे पोलिसांचा नागरिकांमध्ये धाक नाही का असा सवाल निर्माण होत आहे.मंगळवारी जंगलीमहाराज रस्ता, बुधवारी हडपसर तर गुरुवारी सिंहगड रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुन्यावादातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूलच्या परिसरात घडली.

घटना क्रमांक एक जंगली महाराज रस्ता : बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

मंगळवारी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात एका मोबाइल शोरुमच्या गल्लीत धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय 38, रा. खडकी) यांच्यावर काही आरोपींनी पिस्तूल रोखून त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. अरगडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिससमोर ही घटना घडली.यामध्ये बाल बाल बचावले आहेत.ताबडतोब त्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगत गुन्हा नोंदवला आहे. 

घटना क्रमांक दोन हडपसर : व्यवसायिक स्पर्धेतून गोळीबार

तर दुसरी घटना हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी घडली. हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी व्यवसायिक स्पर्धेतून एका निवृत्त लष्करी जवानाने एकावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय 53) जखमी झाले. सुधीर रामचंद्र शेडगे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

घटना क्रमांक तीन भुमकर चौक : माचिस मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादामधून गोळीबार

या दोन्ही घटना ताज्या असतानाच शुल्लक कारणावरून तिसरी गोळीबाराची घटना घडली आहे.एकाने माचिस दिली नाही म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटे सिहंगड रस्त्यावरील भुमकर चौकात २.३० च्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.गणेश गायकवाड (रा. वारजे) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे. तिसरं घटना घडल्यानंतर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडला असतानाच आज पहाटे चौथी गोळीबाराची घटना घडली आहे.

घटना क्रमांक चार येरवडा : जुन्यावादातून तरुणावर गोळीबार

आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुन्यावादातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूलच्या परिसरात घडली.विकी चंदाले असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चंदाले असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमी आणि आरोपी यांच्यात जुना कारणावरून भांडण आणि वाद होते. तर दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, याच वादातून त्याने विकीवर गोळीबार केल्याची माहिती आहे.