सार
नातेवाईकांच्या लग्नाच्या आनंदात असलेल्या तरुणांनी कारच्या सनरूफवर फटाके फोडल्याने कारला आग लागून दोघे जखमी झाले.
सहारनपूर: काही दिवसांपूर्वी कारच्या सनरूफवर माकड पडल्याने सनरूफ तुटून माकड कारमध्ये पडले होते. ही घटना विसरून जाण्याआधीच, दोन मूर्ख तरुणांनी कारच्या सनरूफवर फटाके फोडल्याने संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली.
नातेवाईकांच्या लग्नाच्या आनंदात असलेल्या तरुणांनी कारच्या सनरूफवर फटाके फोडल्याने कारला आग लागल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडली. सुरक्षित, मोकळ्या जागी फटाके फोडण्याऐवजी, दोन तरुणांनी कारच्या सनरूफवर फटाके ठेवून आग लावली. आग लावल्यानंतर फटाके उलटले आणि कारमध्ये पडले. परिणामी, संपूर्ण कार आगीच्या भक्षस्थानी पडली आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेत कारमध्ये बसलेले दोघे जखमी झाले आहेत. या घटनेचे धक्कादायक दृश्य आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नाच्या आनंदासाठी हे फटाके उडवण्यात आले होते आणि त्यामुळे लाखो रुपयांची कार जळून खाक झाली. सहारनपूरच्या गंडवेडा गावातील एका रहिवाशाच्या लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान हा आनंद साजरा करण्यासाठी फटाके उडवण्यात आले. वराच्या नातेवाईकांना रात्री डेहराडूनला जायचे होते. त्यावेळी फटाके उडवण्यात आले. सनरूफमधून कारमध्ये पडलेले फटाके तिथेच फुटू लागले आणि कारमधील दोघे जखमी झाले. कारमधील लोक लगेच बाहेर पडले आणि किरकोळ जखमांनी बचावले. तरुणांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे लाखो रुपयांची कार जळून खाक झाली. जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
व्हिडिओ येथे पहा: