Neha Hiremath Murder Case : लव्ह जिहाद की प्रेम संबंध का झाली नेहा हिरेमाठ ची हत्या ? वाचा सविस्तर

| Published : Apr 19 2024, 07:53 PM IST / Updated: Apr 20 2024, 11:13 AM IST

Neha-Hiremath-Murder-Fayaz-Karnataka

सार

कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठचा तिच्याच महाविद्यालयात निर्घृण खून करण्यात आला. खून करणारा हा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्याला काही तासातच पोलिसांनी अटकही केली.

Neha Hiremath Murder Case : कर्नाटकच्या हुबळी-धारवाड येथील महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठचा तिच्याच महाविद्यालयात दिवसाढवळ्या फयाझ नामक मुलाने निर्घृण खून केला. खून करणारा हा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्याला काही तासातच पोलिसांनी अटकही केली. मात्र या हत्येनंतर हुबळीमधील राजकारण तापले असून विरोधकांनी सत्ताधार्यांना कैचीत पकडले आहे.

नेहाच्या वडिलांचं काय म्हणाले ?

नेहाचे वडील आणि काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी सांगितले की, मी फयाजला ओळखतो.त्याने नेहाला प्रेम करत असल्याचे सांगितले होते. मात्र नेहाने त्याला नकार दिला आणि त्यातून हि घटना घडली आहे. नेहाने मला सांगितले होते त्यानुसार मी त्याला बजवाले होते की,त्याने नेहाचा नाद सोडून द्यावा, तिचा पाठलाग करू नये. नेहाने फयाजचा प्रस्ताव नाकारलाच शिवाय आपण वेगवेगळ्या धर्मातील आहोत हे देखील सांगितले होते. त्यामुळे आपण पुढे जाऊन शकत नाही. मात्र तरीही फयाजने माझ्या मुलीचा बळी घेतला आहे.

नेमकी घटना काय?

कर्नाटकातल्या हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीचा खून करण्यात आला. फैयाज नावाच्या मुलाने चाकूने भोसकून तिला ठार केलं. त्यानंतर तो फरार झाला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी म्हटलं की, फैयाज हा जुना विद्यार्थी होता. त्याने माझ्या मुलीला प्रपोज केलं होतं. परंतु तिने त्याचं प्रपोजल नाकारलं होतं. तिला फैयाज आवडत नव्हता, त्यामुळे ती या सगळ्यापासून दूर राहू इच्छित होती. म्हणूनच तिचा खून करण्यात आल्याचं मृत मुलीच्या नगरसेवक वडिलांनी सांगितलं.

सत्ताधारी काँग्रेसवर भाजपने केला लव्ह जिहादचा आरोप :

भाजपाने मात्र हे प्रकरण लव्ह जिहादजे असल्याचा आरोप केला आहे. यात लव्ह जिहादचा विषय आहे. जेव्हा पीडित मुलीने आरोपीच्या प्रेमाला नकार दिला, त्यातूनच हा गुन्हा घडला. काँग्रेसच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून पोलिसांचा नागरिकांवर अंकुश नाही असे देखील आरोप केले आहेत.