सार

नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या असून या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भूषण लहामागेची वैमनस्यातून हत्या

नाशिक-मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगला होता. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.