सार

मुंबईतील चेंबूर परिसरातील डायमंड गार्डनजवळील सिग्नलवर बाइकवरुन आलेल्या दोघांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये व्यावसायिकाला दोन गोळ्या लागल्या आहेत.

Chembur Firing : मुंबईतील चेंबूर परिसरात बुधवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळी बाइकवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी व्यावसायिक सदरुद्दीन खान याच्यावर गोळीबार केला. यावेळी सदरुद्दीनला दोन गोळ्या लागल्याचे सांगितले जात आहे. सध्या व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर आहे. या घटनेच माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

 

 

घरी जाताना गोळीबार

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सदरुद्दीन खान आपल्या कारने घरी जात होता. यावेळी कार डायमंड गार्डनजवळील सिग्नलवर पोहोचली असता बाइकवरील अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यानंतर पळ काढला.

डीसीपी झोन-6 नवनाथ यांनी घटनेची माहिती देत सांगितले की, रात्री 10 वाजल्याच्या सुमारास डायमंड गार्डन सिग्नलवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली. यवेळी एक कार सिग्नलजवळ थांबली असता बाइकवरुन आलेल्या दोघांनी व्यावसायिकावर गोळीबार केला. यामध्ये व्यावसायिक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

फॉरेंसिक टीमकडून पुरावे जप्त

पोलिसांनी परिसराला घेराव घालून तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शोधून काढले जात आहे. घटनास्थळी फॉरेंसिक टीमकडून तपास करण्यासाठी आली होती. यांनी पुरावे जमा केले असून पोलिसांकडून या प्रकरणात प्रत्येक अँगलमधून तपास केला जात आहे.