सार
ब्लिंकिटवर १ ग्रॅमचे सोने नाणे ऑर्डर केलेल्या व्यक्तीला ०.५ ग्रॅमचे सोने नाणे पाठवण्यात आले. कंपनीच्या निदर्शनास आणेपर्यंत तक्रार विंडो बंद करण्यात आली होती.
नवदिल्ली : ऑनलाइन १ ग्रॅमचे सोने नाणे ऑर्डर केलेल्या व्यक्तीला अर्धा ग्रॅमचे सोने नाणे पाठवल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटवर १ ग्रॅमचे सोने नाणे ऑर्डर केले होते. मात्र, कंपनीने ०.५ ग्रॅमचे सोने नाणे पाठवले. याबाबत कंपनीच्या निदर्शनास आणेपर्यंत कंपनीने तक्रार विंडो बंद केली होती, अशी तक्रार त्यांनी केली आहे. ब्लिंकिटवरून ऑर्डर घेताना मी घरी नव्हतो. माझा भाऊ ही ऑर्डर घेतली, असे त्यांनी सांगितले.
मोहित जैन नावाच्या व्यक्तीने त्यांच्या ट्विटर हँडलवर ही बाब पोस्ट केली आहे. मालाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिटद्वारे १ ग्रॅम सोने आणि १० ग्रॅमचे चांदीचे नाणे ऑर्डर केले होते. त्या ब्रँडचे १ ग्रॅमचे सोने नाणे ₹८,२४९ रुपये असताना ०.५ ग्रॅमचे नाणे ₹४,१२५ रुपये आहे. कंपनीच्या चुकीमुळे त्या व्यक्तीला ४१२४ रुपयांचा तोटा झाला आहे. त्यांनी ग्राहक सेवेशी संवाद साधत असलेले स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये विंडो बंद करण्यात आल्याचे बॉटने उत्तर दिले आहे.
ब्लिंकिटच्या अधिकृत हँडल, मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या हँडल आणि काही वृत्तसंस्थांच्या टॅग्जसह झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल (ब्लिंकिटचे मालकी हक्क झोमॅटोकडे आहेत) यांना टॅग करून 'ब्लिंकिटने माझी फसवणूक केली आहे..' असे लिहिले आहे. "ब्लिंकिटची ग्राहक सेवा खूपच वाईट आहे. एआय बॉट्सशी चॅट करावे लागत असल्याने ब्लिंकिटवरून मी एवढ्या महागड्या वस्तू ऑर्डर करणे ही पहिलीच आणि शेवटची वेळ आहे", असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी डिलिव्हरी एजंटला फोन केला तेव्हा "त्यांच्याशी बोलताना अक्षरशः रडत होते", असे त्यांनी सांगितले. मात्र, डिलिव्हरी करणारा व्यक्ती या प्रकरणात असहाय्य होता, असे त्यांनी सांगितले.