नांदेडमध्ये आयकर विभागाची कारवाई, 8 किलो सोने व 14 कोटी रोकडसह 170 कोटी जप्त

| Published : May 14 2024, 09:09 PM IST

nanded seized 170 crore

सार

नांदेडमध्ये संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात 14 कोटी रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

नांदेड : नांदेडमध्ये संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात आता 14 कोटी रुपये रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 14 कोटीची रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 14 तास लागल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईत काही महत्वपूर्ण दस्तावेज सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागले आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने मिळाल्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. ज्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली ते भंडारी बंधू हे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात आहेत.

आयकर विभागाची ही कारवाई गेल्या 72 तासापासून सुरु असून अद्याप पोलीस आणि आयकर विभाग पुढील तपास करत आहेत. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच या तपासाचे धागेदारे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती लागत आहे.

कोण आहे फायनान्सर भंडारी?

नांदेड मधील शिवाजीनगर भागात भंडारी यांचा निवस्थानी आयकर विभागाने छापा मारला. त्यानंतर भंडारी यांच्या संस्था आदिनाथ अर्बन मल्टिस्टेट या ठिकाणी चौकशी करत त्यांचा घरासह सर्व आस्थापनांची आयकर विभागे चौकशी केली. त्यानंतर निवासस्थानी जाऊन घराची तपासणी केल्यानंतर 14 कोटी रूपये मिळाले. तर 8 किलो सोने देखील जप्त करण्यात आले. भंडारी हे 7 भाऊ आहेत. महावीर भंडारी, संजय भंडारी, पदम भंडारी, विनय भंडारी, संतोष भंडारी, आशिष भंडारी, विजय भंडारी हे ते 7 भाऊ आहेत. गेल्या 15 वर्षापासून संजय भंडारी हे बीसी फायनान्सच्या व्यवसायात उतरले.