छत्रपती संभाजीनगर येथे एका पतीने आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन मित्राच्या हवाली केले. यानंतर पतीच्या मित्राने आणि दिराने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीला औषध देऊन मित्राजवळ सोडलं. नवऱ्यानं औषध म्हणून आपल्या पत्नीला गुंगीचं औषध दिलं होतं. या प्रकरणात महिलेच्या दिरासोबतच नवऱ्याच्या मित्राने तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय झालं?
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५च्या काळात छत्रपती संभाजीनगर भागात विवाहितेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात पती, दिर, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी शेख रिजवान याला अटक केली. त्याला न्यायालयाने २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी २० वर्षीय पीडितेने गुन्हा दाखल केला असून तीच १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याची माहिती समजली आहे.
पीडितेचा मोबाईल क्रमांक घेऊन दिला त्रास
पीडित महिलेच्या पतीच्या मित्राकडे मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर रिजवान वारंवार फोन करून पीडितेशी संवाद साधत होता. तो महिलेला मी तुला लाईक करतो, माझ्याशी बोल असं म्हणायचा. याबद्दल पीडित महिलेने पतीला आणि सासरच्या मंडळींना माहिती दिली होती. पण उलट तिलाच सासरच्या मंडळींकडून वाईट बोलू नकोस असं बजावून सांगण्यात आलं.
रिजवानने मित्राच्या पत्नीवर केला अत्याचार
रिजवानने मित्राच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ६ एप्रिल २०२५ रोजी पीडितेच्या नवऱ्याने तिला कोल्ड्रिंक पाजले. त्यानंतर महिलेला उलट्या आणि मळमळ याचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर कामाचे कारण देऊन पतीने रिजवानला पत्नीला घरी सोडण्यास सांगितलं. त्यानंतर रिजवानने मित्राच्या पत्नीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
रिजवानने मित्राच्या पत्नीला माझ्यासोबत बोलली नाहीस तर व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकून व्हायरल करील अशी धमकी दिली होती. एप्रिल २०२५ मध्ये पीडित महिलेने तिच्या दिराला याबाबत माहिती दिली. त्यानंही पीडितेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वी महिलेने तक्रार दिल्यामुळं नवऱ्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


