मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तील अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीकडे तब्बल 23 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आढळून आले.
Mumbai : सीमाशुल्क विभाग आणि महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण २३ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ व सोने जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
थायलंडहून उशांमध्ये लपवून आणलेला गांजा जप्त
प्रथम कारवाईत, बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांच्या बॅगेतील उशांमध्ये व्हॅक्यूम सील पद्धतीने लपवलेला १२ किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ सापडला. ११ कोटी ८८ लाख रुपये किमतीचा ११ किलो ८८१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोकेनच्या ६७ कॅप्सूलसह विदेशी नागरिक पकडला
दुसऱ्या कारवाईत, डीआरआयने आयव्हरी कोस्टचा नागरिक सिएरा लिओनहून मुंबईत दाखल होताच अटक केली. त्याने कोकेनच्या ६७ कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली रुग्णालयात तपासणीदरम्यान १,१३० ग्रॅम कोकेन मिळाले, ज्याची किंमत सुमारे ११.३९ लाख रुपये आहे.
विमानतळ कर्मचाऱ्यांकडून सोन्याची तस्करी उघड
तिसऱ्या प्रकरणात, मुंबई विमानतळावर कार्यरत दोन कर्मचाऱ्यांकडून २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली. त्यांच्या मोज्यांमध्ये लपवलेल्या मेणबत्त्यांतून वितळवल्यानंतर चार किलो ४४० ग्रॅम वजनाचे सोनं सापडलं. सव्वाचार कोटी रुपये किमतीचं हे सोने जप्त करण्यात आलं असून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
मुंबई विमानतळावर ड्रग्ज पकडल्याची घटना
मुंबई विमानतळावर 18 जूनला थायलंडमधून आलेल्या एका गुजरात आणि भायंदरच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या घटनेत 18 व्हॅक्यूम सील पॅक्समध्ये हाइड्रोपोनिक गांजा लपवण्यात आला होता. याची किंमत तब्बल 25 कोटी रुपये होती.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


