सार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहे. निर्मला सीतारमण यांच्या कार्यकाळातील सातत्याने आठवा अर्थसंकल्प त्यांना सादर करता येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
Budget 2025 10 Big Points : आज देशाचा अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री आठव्यांदा यंदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचे कागपदपत्र पटलावर ठेवले जातील. शुक्रवारी (31 जानेवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते की, हा ऐतिहासिक अर्थसंकल्प असेल. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाकडून खास अपेक्षा आहेत. जाणून घेऊया 10 पॉइंटमध्ये अर्थसंकल्पाबद्दलच्या 10 मोठ्या अपेक्षा सविस्तर...
इन्कम टॅक्समध्ये दिलासा
अर्थसंकल्प 2025 कडून सर्वाधिक मोठी अपेक्षा करदात्यांना आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात नव्या कर व्यवस्थेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागणार नाही अशी घोषणा करू शकतात. याशिवाय 15 लाख रुपये ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी 25 टक्के नवी कर व्यवस्था लागू केली जाऊ शकते.
स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ
सरकारकडून स्टँडर्ड डिडक्शनच्या मर्यादेत पुन्हा एकदा बदल केला जाऊ शकतो. याआधी नव्या कर व्यवस्थेअंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्यात आली होती. आता पगारदार कर्मचारी आणि पेन्शनधारक जुनी कर प्रणाली अंतर्गत 50 हजार आणि नव्या व्यवस्थेअंतर्गत 75 हजार रुपयांची मानक कपातीचा लाभ घेतात. तज्ञांनुसार, यामध्ये वाढ होऊन 1 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.
कलम 80C च्या कपातीमधील मर्यादेत वाढ
अशीही चर्चा आहे की, यंदा कलम 80C च्या अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. सध्याच्या स्थितीत 80C अंतर्गत कपातीची अधिकाधिक मर्यादा दीड लाख रुपये आहे. दरम्यान, महागाई आणि करदात्यावर वाढलेल्या आर्थिक दबावामुळे तज्ञ सरकारकडून याची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहेत. यामध्ये वाढ होऊन कमीत वर्षाला कमी 2 लाख रुपये होऊ शकते.
वृद्धांना मिळू शकते गिफ्ट
वयोवृद्धांसाठी अर्थसंकल्प 2025 मध्ये काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, वयोवृद्धांसाठी हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियमची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये केली जाऊ शकते. तर अन्य नागरिकांसाठी हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची मर्यादा वाढवून 50 हजार रुपयांपर्यंत होण्याची शक्यता आहे. याशिवाय वयोवृद्धांना रेल्वेमध्ये सूट देण्याच्या मागणीवर अर्थमंत्र्यांकडून घोषणा केली जाऊ शकते.
महिलांसंबंधित योजनांचा विस्तार
सरकारने वर्ष 2024-25 मधील अर्थसंकल्पात महिला सशक्तीकरणासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना सरकार या रक्कमेत वाढ करेल याची अपेक्षा आहे. याशिवाय महिलांसाठी महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट सारख्या योजनांची मर्यादा वाढवली जाऊ शकते. ही योजना 31 मार्च 2025 रोजी बंद होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ होण्याची अपेक्षा आहे. Bofa च्या रिपोर्टनुसार, सरकारकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. सध्या या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीन हप्तांमध्ये शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात.
किसान क्रेडिट कार्ड
शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. अशी अपेक्षा केली जात आहे की, किसान क्रेडिट कार्डवर कर्जाची मर्यादा वाढून 5 लाख रुपये होऊ शकते. सध्या या शासकीय योजनेअंतर्गत मर्यादा 3 लाख रुपये आहे.
याशिवाय आठवी अपेक्षा सरकारकडून एनपीएस योजनेमधून अपेक्षा तर नववी वयोवृद्धांना हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियम मर्यादेत वाढ आणि दहावी अपेक्षा अटल पेन्शन योजनेमधील फायद्यामध्ये वाढ होण्यासंबंधित आहे.
आणखी वाचा :
Budget 2025: अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य करदात्याला मोठी आशा, काय होणार घोषणा?