अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत 11 वाजता सादर करण्यास सुरुवात करणार आहेत. अर्थसंकल्प 11 वाजताच का सादर केला जातो हे माहितेय का?
अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेबद्दल सांगायचे झाल्यास ब्रिटिशांच्या शासनकाळापासून अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर करण्याची परंपरा होती.
जेणेकरुन रात्रभर अर्थसंकल्पासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आराम मिळू शकेल.
दुसरे कारण असे होते की, ज्यावेळी भारतात संध्याकाळी 5 वाजायचे तेव्हा लंडनमध्ये सकाळचे 11.30 वाजायचे.
आणखी एक खास गोष्ट अशी की, वर्ष 1955 पर्यंत अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेत सादर केला जात होता. पण नंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेत सादर होऊ लागला.
भारतात सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये बदल वर्ष 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये झाला होता.
वर्ष 1999 मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा होते. यांनी 27 फेब्रुवारी 1999 रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला होता.
अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर करण्याच्या परंपरेत 53 वर्षानंतर बदल करण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत अर्थसंकल्प 11 वाजता सादर केला जात आहे.