भेसळयुक्त पेट्रोल ओखळण्यासाठी 6 ट्रिक्स, फसवणूकीपासून रहाल दूर
भेसळयुक्त पेट्रोल वाहनामध्ये भरल्यास त्याचा माइलेजसोबत इंजिनवर प्रभाव पडला जातो. अशातच भेसळयुक्त पेट्रोल कसे ओखळायचे याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया...
Chanda Mandavkar | Published : Sep 11, 2024 8:34 AM / Updated: Sep 11 2024, 09:16 AM IST
Purity of petrol how to check : भेसळयुक्त दूध, तूप, मसाले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सर्रास मार्केटमध्ये विक्री केल्या जातात. पण तुम्हाला माहितेय का, खाण्यापिण्याच्या वस्तूच नव्हे पेट्रोलमध्येही भेसळ केली जाते. याचा वाहनाच्या माइलेज आणि इंजिनवर प्रभाव पडला जातो. अशातच पेट्रोल उत्तम गुणवत्तेचे असणे अत्यंत गरजेचे आहे.
पेट्रोलमध्ये भेसळ केल्याच्या अनेक तक्रारी आजवर समोर आल्या आहेत. यामुळे पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना ते शुद्ध असेल की नाही अशी शंका मनात निर्माण होतोच. जाणून घेऊया भेसळयुक्त पेट्रोल ओखळण्यासंदर्भातील काही सोप्या ट्रिक्स सविस्तर...
भेसळयुक्त पेट्रोल असे ओखळा
भेसळयुक्त पेट्रोल ओखळण्यासाठी फिल्टर पेपरची मदत घेऊ शकता. यासाठी पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर घ्या. या पेपरवर पेट्रोलचे काही थेंब टाका. आता फिल्टर पेपरवर कोणताही डाग नसल्यास समजून जा पेट्रोल शुद्ध आहे. पण पेपरवर डाग पडल्याचा अर्थ होतो की, भेसळयुक्त आहे.
फिल्टर पेपर नसल्यास पेट्रोलची शुद्धता ओखळण्यासाठी A4 पेपरची मदत घेऊ शकता. यावर काही पेट्रोलचे थेंब टाका. पेपरवर डाग पडल्यास पेट्रोलमध्ये भेसळ केल्याचे समजून जा.
अन्य ट्रिक्स
पेट्रोलची घनता पेट्रोलची शुद्धता त्याच्या घनतेवरुन केली जाऊ शकते. घनता 730 ते 00 दरम्यान अल्यास पेट्रोल शुद्ध असल्याचे मानले जाते. याशिवाय शुद्ध डिझेलची घनता 830 ते 900 दरम्यान असते.
पाण्याने चाचणी भेसळयुक्त पेट्रोलची ओखळ पटवण्यासाठी पाण्याची मदत घेऊ शकता. यासाठी स्वच्छ काचेवर थोडेसे पेट्रोल आणि पाणी मिक्स करा. या दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स झाल्यास अथवा पेट्रोलच्या पृष्ठभागावर सप्तरंग दिसल्यास ते शुद्ध नाही.
रंगाची चाचणी पेट्रोलची शुद्धता त्याच्या रंगावरुनही केली जाऊ शकते. यासाठी पेट्रोलचा रंग पिवळा आहे की नाही हे पाहा. पेट्रोलचा रंग गडद असल्यास ते अशुद्ध असल्याची शक्यता वाढली जाते.
वास पाहा पेट्रोलचा एक खास वास असतो. पण पेट्रोलला विचित्र वास येत असल्यास ते भेसळयुक्त असण्याची शक्यता असू शकते.
भेसळयुक्त पेट्रोलविरोधात अशी करा तक्रार
एखाद्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त पेट्रोलची विक्री केली जात असल्यास त्यांच्या विरोधात कंज्युमर कोर्टात तक्रार दाखल करू शकता. याशिवाय पेट्रोल विक्री करणाऱ्या कंपनीकडे नुकसान भरपाईही मागू शकता.
बहुतांश पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री केल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा नंबर लिहिलेला असतो. भेसळयुक्त पेट्रोल आढळल्यास तुम्ही थेट अधिकाऱ्यांना तक्रार करू शकता.