भारतीय बनावटीचा Hanooman AI चॅटबॉट लाँच, स्वदेशी भाषांना सपोर्ट करण्यासह देण्यात आल्यात 'या' खास गोष्टी

Hanooman AI platform : आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमुळे अनेक कामे करणे सुखकर झाले आहे. अशातच भारतीय बनावटीचे आर्टिफिशिअल इंटेलिजेंस नुकतेच लाँच करण्यात आले आहे. याला 'हनुमान एआय' असे नाव दिले आहे. 

Chanda Mandavkar | Published : May 11, 2024 3:37 AM IST / Updated: May 11 2024, 11:42 AM IST

Hanooman AI Launched : भारतीय बनावटीचा पहिलाच 11 भाषा समजून घेणारा जेनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉट नुकताच लाँच करण्यात आला आहे. याशिवाय जगभरातील 98 भाषा हनुमान एआय चॅटबॉट समजून घेण्यास सक्षम आहे. हनुमान एआय चॅटबॉटला सात आयआयटी, रिलायन्स, SML इंडिया आणि अबू धाबीमधील 3एआय होल्डिंगने मिळून तयार केले आहे.

हनुमान एआय चॅटबॉट इंग्रजी भाषा (English Language) न समजणाऱ्या युजर्सला लक्षात घेत तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदीसह भारतातील 11 भाषा युजर्सला उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी भाषेचा समावेश आहे.

अँड्रॉइड युजर्सने असा करा डाउनलोड
हनुमान एआय चॅटबॉट अँड्रॉनइड युजर्सला गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. येथूनच अँड्रॉइड युजर्सला हनुमान एआय चॅटबॉट डाउनलोड करता येणार आहे. युजर्ससाठी भारतीय बनावटीचा आर्टिफिशिअल इंटेलिजेंस चॅटबॉट विनाशुल्क वापरता येणार आहे. याशिवाय आयओएस (iOS) युजर्सला लवकरच चॅटबॉट उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

हनुमान चॅटबॉट कसे काम करणार?
हनुमान चॅटबॉट LLM मेथडवर काम करणार आहे. ज्याला स्पीच टू टेक्स्ट युजर फ्रेंडली सर्विस असे म्हटले जाते. हनुमान चॅटबॉट मोठ्या स्तरावर डेटा शिकून नॅच्युरल साउंड सेस्पॉन्स जनरेट करतो. Open AI आणि Google Gemini AI ला टक्कर देण्यासाठी रिलायन्सने एक उत्तम सुरुवात केली आहे.

भारतात अन्य AI मॉडलेची चाचणी
हनुमान चॅटबॉट आणि BharatGPT व्यतिरिक्त देशातील काही दुसऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजेंस मॉडेलची चाचणी केली जात आहे. यामध्ये Sarvam आणि Krutrim सारख्या कंपन्या देखील आर्टिफिशिअल इंटेलिजेंस तयार करत आहे. जर भारतीय बनावटचे सर्व आर्टिफिशिअल इंटेलिजेंस लाँच झाल्यास भारतीय युजर्सला Open AI आणि Gemini AI वर अवलंबून रहावे लागणार नाही.

या क्षेत्रांना होणार फायदा
आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमुळे शासकीय, वैद्यकीच, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात फार फायदेशीर ठरणार आहे. हे आर्टिफिशिअल भारतासाठी माइलस्टोन ठरणार आहे. याशिवाय कंपनीसाठी BharatGPT डेव्हलप करणेही सोपे होईल. भारतीय बनावटीच्या हनुमान चॅटबॉटच्या मदतीने इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या युजर्सला हिंदी आणि आपल्या स्थानिक भाषेत वापर करता येणार आहे.

आणखी वाचा : 

WhatsApp वर एखाद्याने ब्लॉक केलयं? असे काढा शोधून

RBI चा मोठा निर्णय, या बँकांमधून 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर घातली बंदी

Share this article