ATM Card वर मिळतो 10 लाखांपर्यंतचा Free Insurance, क्लेमसाठी फॉलो करा या स्टेप्स

आजकाल बहुतांशजणांकडे डेबिट कार्ड असते. यालाच ATM कार्डही म्हटले जाते. कोणत्याही बँकेटे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा अधिक दिवस वापरल्यास त्यावर फ्री इन्शुरन्सची सुविधा दिली जाते.

Free Insurance Through ATM : आजच्या काळात फार कमी प्रमाणात एटीएम कार्डचा वापर केला जातो. पंतप्रधान जन-धन योजना (PM Jan Dhan Yojana) आणि रुपे कार्डमुळे (Rupay Card) एटीएम प्रत्येकाच्या आयुष्यातील आणि दररोजच्या दिवसातील महत्वाचा हिस्सा झाले आहे. एटीएमच्या माध्यमातून बँक खात्यातून पैसे भरणे किंवा काढता येत नाही. याचा अन्य कामांसाठीही वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी खरेदी करताना रोख रक्कम देण्याएवजी काहीजण एटीएम कार्डच्या माध्यमातून पेमेंट करतात. एटीएमचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे एटीएमच्या माध्यमातून प्रीमियम न भरता इन्शुरन्सची सुविधा दिली जाते.

बँकेकडून ज्याप्रकारे एटीएम कार्ड जारी केले जाते. त्याप्रकारे कार्ड होल्डर्सला अपघाती इन्शुरन्स आणि अकाली मृत्यूसंदर्भात इन्शुरन्स दिला जातो. देशातील बहुतांशजणांना याबद्दल माहिती नसते की, डेबिट कार्डवरही जीवन बीमाचे कवर दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, पर्सनल एक्सीडेंटल इन्शुरन्स नॉन एअर बीमा डेबिट कार्ड होल्डरला अकाली मृत्यूवेळी बीमाची रक्कम दिली जाते.

ATM कार्डवरील फ्री इन्शुरन्सची रक्कम
कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड 45 दिवसांपेक्षा अधिक दिवस वापरल्यास तुम्हाला फ्री इन्शुरन्स मिळू शकतो. यामध्ये एखादी दुर्घना झाल्यानंतर मिळणारा बीमा आणि जीवन बीमाचा समावेश आहे. या दोनी स्थितींमध्ये इन्शोरन्सचा क्लेम करता येतो. कार्डच्या कॅटेगरीनुसार रक्कम ठरवली जाते.

बँकनेनुसार बीमाचे मिळते कव्हर
एसबीआय बँकेने आपल्या गोल्ड एटीएम कार्ड होल्डरला 4 लाखांपर्यंत (death on air), 2 लाख रुपये (non-air) चे कव्हर देते. याशिवाय प्रीमियम कार्ड होल्डरला 10 लाख (death on air), 5 लाख रुपये (non-air) कव्हर मिळते. याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बंक आपल्या डेबिट कार्डवर वेगवेगळ्या रक्कमेचे कव्हर देते. काही डेबिट कार्ड 3 कोटी रुपयांपर्यंत फ्री एक्सीडेंटल इन्शुरन्सचे कव्हर देते. हा इन्शुरन्स कव्हरेज फ्री मध्ये दिला जातो. यासाठी बँकेकडून कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे मागितली जात नाहीत.

डेबिट कार्डच्या माध्यमातून ट्रांजेक्शन होणे महत्वाचे
इन्शुरन्सचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा निश्चित काळाआधी डेबिट कार्डच्या माध्यमातून काही ट्रांजेक्शन केले जातात. हा कालावधी वेगवेगळ्या कार्डसाठी वेगळा असू शकतो. काही एटीएम कार्डवर इन्शुरन्स पॉलिसी सुरु करण्यासाठी कमीत कमी 30 दिवसात एकदा तरी ट्रांजेक्शन करणे गरजेचे असते. काही कार्डहोल्डर्सला इन्शुरन्स कव्हरेज मिळण्यासाठी गेल्या 90 दिवसांमध्ये एकदा तरी एटीएमच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करावे लागते.

आणखी वाचा : 

Gold Price : मुंबईत सोन्याची किंमत घसरली, आजचा काय आहे भाव?

जगातभारी! मुकेश अंबानींच्या आलिशान Antilia बद्दलच्या 10 खास गोष्टी

Share this article