जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अँटेलिया उभारण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. जेणेकरुन संपूर्ण परिवाराला उत्तम आयुष्य जगता येईल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आपली पत्नी नीतासह मुलगा आकाश,अनंत यांच्या पत्नी व मुलांसोबत अँटेलियात राहतात.
अँटेलिया 4000,000 स्क्वेअर फूट, 570 उंच आणि 27 मजली आहे. अँटेलिया जगातील सर्वाधिक महागडा परिसर साउथ मुंबईतील अल्टामाउंड रोडवर स्थित आहे.
अँटेलियाचे नाव एका पौराणिक बेटावरुन ठेवण्यात आले आहे. अँटेलियाची वास्तूकला सूर्य, कमळ, मौल्यवान स्टोन, संगमरवर, आणि मदर ऑफ पर्लवर आधारित आहे.
अँटेलियाचे बांधकाम वर्ष 2006 मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला बांधकाम ऑस्ट्रेलियातील कंपनी लीटन एशिया करत होती. पण बी.ई. बिलिमोरिया अँड कंपनी लिमिटेडने अँटेलियाची उभारले.
अँटेलियाचे डिझाइन शिकोगोमधील आर्किटेक्चर फर्म पर्किन्स अँड विल आण हिर्श बेडनर एसोसिएट्स यांनी डिझाइन केले होते. वर्ष 2010 मध्ये अँटेलियाचे बांधकाम पूर्ण झाले होते.
अँटेलियात काही सुखसोयी आहेत. 168 कारसाठी पार्किंग, बॉलरुम, मिनी थिएटर, हँगिंग गार्डन, स्विमिंग पूल, स्पा, मंदिर अशा काही अत्याधुनिक सुविधा आहेत.
अँटेलियाची देखभाल करण्यासाठी 600 कर्मचारी आहेत. या सर्वांना उत्तम पगार दिला जातो. काहींना 1.5 ते 2 लाखांपेक्षा अधिक पगार मिळतो.
मुकेश अंबानींचे घर जगातील सर्वाधिक महागडे प्रायव्हेट घर आहे. अँटेलियाला ग्रीन टॉवर ऑफ मुंबई म्हणून ओळखले जाते. या घरात येणारी उर्जा सोलर पॅनलच्या माध्यमातून येते.
अँटेलियात तीन हेलीपॅड आहेत. याशिवाय 8.0 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के झेलण्याची क्षमता अँटेलियात आहे.