Gold Buying Tips : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करण्याचा विचार करताय का? तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. अशातच सोन्याची शुद्धता ओखळून पाहण्यासाठी पुढील काही ट्रिक्स नक्की वापरू शकता.
Akshaya Tritiya 2024 : देशभरात आज (10 मे) अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. खरंतर, अक्षय्य तृतीयेला सोन्याची अधिक मागणी वाढलेली असल्याने नागरिकांची फसवणूक होण्याचीही शक्यता अधिक असत. अशातच अक्षय्य तृतीयेला सोन खरेदी करणार असल्यास खरं आणि खोट सोनं कसे ओखळायचे याबद्दलच्या काही ट्रिक्स जाणून घेऊया.
चुंबकाचा वापर
सोन्यामध्ये चुंबकीय गुण नसतात. याचा अर्थ असा होतो की, चुंबक सोन्याजवळ ठेवल्यास त्याकडे सोनं आकर्षित होत नाही. याउलट घडल्यास समजून जा सोनं खोटं आहे.
नाइट्रिक अॅसिड चाचणी
सोन्याची शुद्धता आणि खरे आहे की नाही तपासून पाहण्यासाठी नाइट्रिक अॅसिड चाचणी करून पाहू शकता. खरंतर शुद्ध आणि खऱ्या सोन्यावर नाइट्रिक अॅसिडचा कोणताही परिणाम होत नाही. पण सोन्यावर नाइट्रिक अॅसिडचा परिणाम झाल्यास समजून जा सोन बनावट आहे.
हॉलमार्क महत्त्वाचे
एखाद्या दुकानातून सोनं खरेदी करताना त्यावरील हॉलमार्क आठवणीने तपासून पाहा. हॉलमार्क असणे म्हणजे सोनं खरं आहे असे समजले जाते. बहुतांश लोकल ज्वेलर्स हॉलमार्कशिवायही दागिन्यांची विक्री करतात. अशावेळी सावध राहिले पाहिजे.
व्हिनेगरचा वापर
व्हिनेगर प्रत्येकाच्या किचनमध्ये असते. सोन्याची शुद्धता ओखळण्यासाठी त्यावर व्हिनेगरचा वापर करू शकता. सोन्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाकल्यानंतर त्याचा रंग बदलल्यास सोनं खोट आहे हे कळते.
सोनं भेसळयुक्त किंवा खोट निघाल्यास अशी करा तक्रार
तुम्ही खरेदी केलेले सोनं भेसळयुक्त किंवा खोटं निघाल्यास तक्रार करू शकता. यासाठी www.BIS.ORG.IN या संकेतस्थळाला भेट देऊन तेथे लॉगइन करा. यानंतर कंम्प्लेन रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करा. तेथे आपला युजर आयडी आणि पासवर्ड भरा. आता एक नवे पेज सुरू होईल तेथेच तुमची संपूर्ण तक्रार नोंदवू शकता.
आणखी वाचा :
RBI चा मोठा निर्णय, या बँकांमधून 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर घातली बंदी
लग्नानंतर आधार कार्डवरील पत्नीचे आडनाव बदलायचेय? जाणून घ्या प्रक्रिया