15Th July 2025 Updates : जाणून घ्या आज मंगळवारचे राशिभविष्य. अंकशास्त्राप्रमाणे तुमचा अंक काय सांगतो तेही माहिती करुन घ्या. निना गुप्ता यांनी इंटिमेसीबद्दल काही माहिती दिली आहे. काय म्हणतात त्या ते वाचा. तसेच मोबाईलवर रिल्स किंवा व्हिडिओ बघितल्यावर लहान मुलांसह इतरांवर काय परिणाम होतता ते जाणून घ्या.

11:57 PM (IST) Jul 15
मुंबई - लोक शारीरिक संबंधातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण ध्यानधारणेतून मिळणारी शांतता आणि आनंद खूप जास्त असतो, असं श्री श्री रविशंकर सांगतात.
10:33 PM (IST) Jul 15
Top 5 Most Expensive Bikes in the World: जगात एकापेक्षा एक धासू सुपरबाइक उपलब्ध आहेत. काही मॉडेल्स इतके महाग आहेत की त्यात तुम्ही फॉर्च्युनर कार सहज खरेदी करू शकाल. चला तर मग, आम्ही तुम्हाला जगातील ५ सर्वात महागड्या बाइक्सबद्दल सांगतो.
10:10 PM (IST) Jul 15
Gharkul Scheme: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३० लाख घरकुल बांधण्याची घोषणा केली आहे. सौरऊर्जेवर आधारित ही घरकुल गरिबांसाठी मोठा दिलासा देणारी आहेत.
07:16 PM (IST) Jul 15
Raigad Heavy Rain : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोलाड आणि आंबेवाडी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अर्धवट कामांमुळे पाणी साचून नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे.
05:59 PM (IST) Jul 15
संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर या मुलाखतीचा छोटासा टीझर शेअर केला असून, त्यात उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत: "आता राज ठाकरेही बरोबर आले आहेत."
05:45 PM (IST) Jul 15
Shahshikant Shinde New President NCP SP: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
05:38 PM (IST) Jul 15
मुंबई - चहा हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण अनेक वेळा आपण चहा बनवताना काही सामान्य चुका करतो, ज्यामुळे चहा कडवट, बेस्वाद किंवा आरोग्याला हानिकारक ठरतो. चला पाहूया अशाच पाच प्रमुख चुका आणि त्यावर उपाय.
04:50 PM (IST) Jul 15
मुंबई - भारताच्या आर्थिक राजधानीत लोकांवर लक्ष्मीची कृपा असते. मुंबईतील लोक पैशांमध्ये खेळतात असेही बोलले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, की ५ अशा राशी आहेत, ज्या लोकांवर लक्ष्मीची कृपा असते. त्यांना पैशांची कधीही कमतरता जाणावत नाही.
04:37 PM (IST) Jul 15
Ganpati Special ST Bus 2025 : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने ५,००० जादा बसेस धाववण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्टपासून विशेष सेवा सुरू होणार असून, २२ जुलैपासून आरक्षण सुरू होईल.
04:02 PM (IST) Jul 15
मुंबई - चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती करत आहे. दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल करत आहे. चीनने आता आणखी एक चमत्कार केला आहे. ६०० किमी प्रतिसास धावणारी रेल्वे आणली आहे. या ट्रेनने तुम्ही मुंबई ते पुणे अंतर केवळ १० मिनिटांत पार करु शकता.
02:37 PM (IST) Jul 15
02:14 PM (IST) Jul 15
निमिषा प्रिया हिला येमेनमधील एका नागरिकाच्या खूनप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १६ जुलै २०२५ रोजी फाशी देण्याची तारीख निश्चित झाली होती. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये ही फाशी स्थगित करण्यात आली आहे.
12:52 PM (IST) Jul 15
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून परत पृथ्वीवर येत आहेत. ते SpaceX ड्रॅगनमध्ये स्वार होऊन १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता प्रशांत महासागरमध्ये उतरतील. NASA आणि Axiom Space या ऐतिहासिक क्षणाचे थेट प्रक्षेपण करतील.
12:50 PM (IST) Jul 15
12:23 PM (IST) Jul 15
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. किरण ही अजूनही जिवंत असून कराड येथे एका व्यक्तीसोबत सापडली आहे, आणि या व्यक्तीबाबत तिचा प्रियकर असल्याचा संशय आहे.
10:56 AM (IST) Jul 15
गेल्या आठवड्यापासून टेस्लाच्या X (पूर्वीचे ट्विटर) वरील इंडिया अकाऊंटवर "Coming Soon" अशी उत्सुकता वाढवणारी पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आज टेस्लाच्या शोरूमच्या उद्घटनानंतर ही प्रतीक्षा संपली आहे.
09:55 AM (IST) Jul 15
पुणे - पुण्यातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, या जलदगती गाड्या शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद, आणि बेलगाव (बेलगावी) या प्रमुख शहरांना जोडतील. या सेवांमुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. जाणून घ्या थांबे…
09:27 AM (IST) Jul 15
पालकत्वाबाबत अनेक गैरसमज प्रचलित आहेत, जसे की स्क्रीन टाइम पूर्णपणे वाईट, बाळाला रडू देणे मानसिक नुकसान करते, चांगले पालक ते असतात जे आपल्या मुलांसाठी सर्वकाही त्याग करतात.
08:52 AM (IST) Jul 15
सोमवारी दुपारी जालंधर-पठाणकोट महामार्गावर त्यांच्या मूळगावी, बेअस (जि. जालंधर, पंजाब) येथे एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले.
08:29 AM (IST) Jul 15
कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. आरोपी मुलींना लिपस्टिक आणि जेल लावून अनैसर्गिक अत्याचार करत असे. आरोपी अनेक महिन्यांपासून मुलींवर अत्याचार करत होता.
08:28 AM (IST) Jul 15
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पाहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण. आज कोणत्या अंकाला सर्व गोष्टी जुळून येतील ते जाणून घ्या.
08:27 AM (IST) Jul 15
मुंबई - पंचांगकार फणीकुमार जोशी यांनी आज मंगळवारचे राशीभविष्य सांगितले आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य जाणून घ्या. अखेरच्या स्लाईडवर वाचा पंचांग. मंगळा गौरी व्रत आज आहे…
08:27 AM (IST) Jul 15
नीना गुप्ता, 'पंचायत' वेब सिरीजमधील अभिनेत्री, वयाशी संबंधित रोमान्सच्या घोतकांना निर्भयपणे मोडतात. त्या म्हणतात की वयानुसार इच्छा कमी होत नाही.
08:26 AM (IST) Jul 15
प्रेम. या एका शब्दांत अनेक आठवणी दडलेल्या असतात. अशीच एक कॉलेजच्या दिवसांमधील प्रेमकथा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. ही प्रेमकथा तुम्हाला भुतकाळात घेऊन जाईल. अनेक आठवणी जाग्या होतील. तर चला रोमांचक प्रेमकथेत प्रवेश करा…
08:24 AM (IST) Jul 15
मुंबई - इन्स्टाग्राम रील्स आणि YouTube शॉर्ट्स सारखे छोटे व्हिडिओ सतत बघणं मेंदूसाठी धोकादायक असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. याचे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात ते जाणून घ्या.