मकर संक्रांतीला काळ्या रंगातीलच वस्र का परिधान करतात? जाणून घ्या धार्मिक कारण

मकर संक्रांतीबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत. याच परंपरेमधील एक प्रथा म्हणजे मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचेच वस्र परिधान करणे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात. यामागील धार्मिक कारण जाणून घेऊया.

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत. याच परंपरेमधील एक प्रथा म्हणजे मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचेच वस्र परिधान करणे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान केले जाते. यंदा मकर संक्रांतीचा सण येत्या 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. अशातच जाणून घेऊया मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान करण्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण...

भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मकर संक्रांती वेगळ्या नावाने साजरी केली जाते. पंजाबमध्ये लोहरी, बंगालमध्ये पोंगल नावाने मकर संक्रांतीची नावे आहेत. नावे वेगवेगळी असली तरीही पतंग आवर्जुन उडवली जाते. या दिवशी तिळाचे लाडू एकमेकांना देण्यासह खिचडी तयार केली जाते. याशिवाय महाराष्ट्रात काळ्या रंगाचे वस्र मकर संक्रांतीवेळी परिधान केले जातात.

खरंतर, मकर संक्रांतीवेळी बहुतांशजण रंगीत किंवा पिवळ्या रंगातील वस्र परिधान करतात. असे करणे भारतीय परंपरेनुसार शुभ मानले जाते. पण महाराष्ट्रात मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचेच वस्र परिधान केले जातात. हिंदू धर्मात काळ्या रंगांचे वस्र सणावेळी परिधान करणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीवेळी सूर्य उत्त दिशेला प्रवेश करत असल्याने व्यक्तीवर कोणतेही संकट येऊ नये आणि व्यक्ती मानसिक-शारिरीक रुपात हेल्दी रहावा यासाठी काळ्या रंगाचे वस्र परिधान करणे शुभ मानले जाते

 

काळे वस्र परिधान करण्यामागील कारण

हिंदू धर्मानुसार, मकर संक्रांतीवेळी सूर्याचे उत्तरायण होते. म्हणजेच सूर्य उत्तर दिशेला जातो. असे म्हटले जाते की, मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होऊ लागते. पण याआधी खूप कडाक्याची थंडी असायची म्हणून काळ्या रंगाचे वस्र परिधान केले जायचे. यामुळे शरीर उष्ण राहण्यास मदत होईल. याशिवाय वैज्ञानिक दृष्टीने काळ्या रंगाचे वस्र परिधान करणे उत्तम असल्याचे मानले गेले आहे.

मकर संक्रांतीसंदर्भातील परंपरा

मकर संक्रांतीबद्दल वेगवेगळ्या परंपरा आणि धार्मिक मान्यता आहेत. या दिवशी तांदूळ आणि उडदाच्या डाळीची खिचडी तयार केली जाते. याशिवाय तिळाचे लाडूही केले जातात. मकर संक्रांतीवेळी कपाळावर हळद किंवा कुंकूचा टिळा लावला जातो. यामुळे मन शांत राहते असे सांगितले जाते.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीआधी बदलणार या 3 राशींचे भाग्य

Bhogi 2025 : मकर संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? घ्या जाणून तारखेसह महत्व

Read more Articles on
Share this article