लहान मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना पोटात जंतांच्या अनेक समस्या होतात. त्यामुळे अनेक आजारही उद्भवू शकतात. हे जंत कसे कमी करायचे त्यामागचं कारण काय आणि त्यावर उपाय काय हे जाणून घ्या
पोटामध्ये जंत होणं ही भारत आणि अनेक देशांमध्ये आढळणारी एक मोठी समस्या असून सामान्य बाब आहे. बहुतांशवेळा याची महत्त्वाची लक्षणं म्हणजे विष्ठेमध्ये लांब जंत दिसणं किंवा पोटात दुखणं तसेच गुदद्वाराजवळ खाज येणं अशी असतात. या लक्षणांनंतर तपासणी करता पुढील निदान केले जाते. पोटामध्ये अशाप्रकारचे जंत दिसतात त्यांना गॅस्ट्रिक वर्म्स असंही म्हटलं जातं. त्याचे राऊंडवर्म्स, फ्लॅटवर्म्स, टेप वर्म्स असे अनेक प्रकार आहेत.
या प्रत्येक जंताची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यांचं जीवनचक्र आणि आपल्या आरोग्यावर होणारे परिणामही वेगवेगळे असतात.मातीच्या संपर्कामुळे आपल्या पोटात जाणाऱ्या जंतांचे राऊंड, व्हीप, हुक, अन्सायलोस्टोमा असे प्रकार आहेत.
जंताची लागण कशी होते?
जंतांची लागण बहुतांशवेळा एखाद्या वस्तूवर जंताची अंडी असतील आणि त्याला आपला स्पर्श झाला तसेच त्यानंतर आपण हात धुतले नाहीत तर होऊ शकते. जंतांची अंडी असलेल्या मातीशी संपर्क येणं किंवा जंताची अंडी असलेल्या अन्नाचं ग्रहण केल्यास किंवा तसे पाणी प्यायल्यास संसर्ग होतो.सांडपाणी व्यवस्था नीट नसलेल्या जागी तसेच शौचकुपं स्वच्छ नसतील तरीही संसर्ग होतो. न शिजवता मांस खाल्ल्यास तसेच जंतांचा संसर्ग असलेले मासे खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. काहीवेळेस पाळीव प्राण्यांमुळेही संसर्ग होऊ शकतो.
अनेक बालकांमध्ये थ्रेडवर्म्सची लागण झालेली दिसून येते. या लांब दोरीसारख्या जंतांची अंडी पोटात गेल्यामुळे त्रास सुरू होतो. या जंतांची अंडी गुदद्वाराजवळ घातलेली असतात. त्यामुळे खाज येते आणि हाताला चिकटतात. ही अंडी कपडे, खेळणी, दात घासायचा ब्रश, स्वयंपाकघर किंवा बाथरुममधील फरशी, अंथरुण, अन्न कशावरही पसरलेली असू शकतात.
या वस्तू किंवा पृष्ठभागांना जे लोक स्पर्श करतात आणि नंतर तोच हात तोंडाला लावतात त्यांना जंतांचा संसर्ग होऊ शकतो. थ्रेडवर्म्सची अंडी दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. अंडी पोटात गेल्यावर त्यातून आपल्या आतड्यात अळ्या बाहेर पडतात आणि एक दोन महिन्यात त्याचे मोठे जंत होतात.
हे थ्रेडवर्म्स होऊ नयेत यासाठी काय ?
पोटात जंत झाल्याचं कसं ओळखायचं?
जंत निर्मूलन का गरजेचं आहे आणि ते कसं करायचं?
जंत निर्मूलन कसं करायचं?
जंतामुळे अनेक आजार लहानमुलं आणि मोठ्या माणसांनाही होत असतात त्यामुळे वर्षातून दोनदा म्हणजे प्रत्येक सहा महिन्यांनी ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 2 वर्षाच्या पुढील मुलांपासून ही प्रक्रिया सुरू करता येईल.
या प्रक्रियेत पोटात आलेले परजिवी बाहेर पडतात. जिथं मातीतून जंत मोठ्या प्रमाणात मुलांच्या शरीरात जातात त्या भागामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ठराविक काळानंतर जंतनिर्मूलनाचा कार्यक्रम सुचवला आहे.
आणखी वाचा :
इंटरमिटेंट फास्टिंग’ केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका? काय सांगतात तज्ज्ञ...
ज्या देशात दहशतवादी हल्ले आणि आर्थिक मंदी तरीही भारतापेक्षा अधिक आनंदी