Published : Nov 11, 2023, 03:58 PM ISTUpdated : Nov 11, 2023, 04:19 PM IST
Diwali 2023 Shubh Muhurat: दरवर्षी आश्विन महिन्यातील अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो. यावेळी यंदा अमावस्या तिथि दोन दिवस असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत लोकांच्या मनात गोंधळ आहे. जाणून घेऊया यंदा दिवाळी सण नेमका कोणत्या तारखेला साजरा करावा?
Diwali 2023 Puja Vidhi-Shubh Muhurat : धार्मिक ग्रंथानुसार दिवाळी सण आश्विन महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. दीपावली हा शब्द संस्कृत भाषेमधील दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ व ‘आवली’ म्हणजेच ‘रांग’ किंवा ‘ओळ’. याचा अर्थ असा होतो की दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दीपावली. दीपोत्सवाशी संबंधित मान्यता आणि परंपरांमुळे हा सण इतर सणांपेक्षा अधिक खास ठरतो.
पण यंदा दिवाळी सण साजरा करण्याबाबत लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. कारण आश्विन अमावस्या तिथि एक नव्हे तर दोन दिवस आहे. मंडळींनो गोंधळ जाऊ नका. जाणून घेऊया दिवाळी सणाची अचूक तिथि, पूजा विधि, शुभ मुहूर्त यासह संपूर्ण व सविस्तर माहिती…
28
यंदा दिवाळी सण कधी आहे? (Kadhi Ahe Diwali 2023)
पंचांगानुसार आश्विन अमावस्या तिथि 12 नोव्हेंबरला (रविवार) दुपारी 02 वाजून 45 मिनिटाला सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबरला (सोमवार) दुपारी 02 वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील. ग्रंथांनुसार दिवाळी दिवशी अमावस्या तिथिनुसार संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि त्यामुळे रविवारीच संध्याकाळी लक्ष्मीपूजन व दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जाईल.
दिवाळीतील शुभ व दुर्मिळ योग (Diwali 2023 Shubh Yog)
उज्जैनमधील ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्या माहितीनुसार, यंदा दिवाळीत एकाच वेळी पाच राज योग आहेत. यामुळे सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. रविवारी म्हणजे 12 नोव्हेंबरला गजकेसरी, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धरा नावाचे दुर्मिळ योग आहेत. यातील गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. याव्यतिरिक्त दिवाळीत आयुष्मान व सौभाग्य योगहा आहेत.
पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे व चौरंग मांडावा. त्यावर लाल रंगाचे कापड ठेवा व देवी लक्ष्मी, श्रीगणेशासह देवी सरस्वतीची प्रतिमा ठेवावी.
देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ताम्हणामध्ये पैशांच्या नोटा-नाणी नक्की ठेवा. चौरंगावर कलश ठेवा. कलशावर कुंकूने स्वस्तिक काढा. कलशावर आंबाच्या डहाळ्या ठेवून श्रीफळ ठेवावे. खाली नमूद केलेला मंत्र उच्चारुन पूजा सामग्रीवर फुलाने पाणी शिंपडावे -
ऊं अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा।
य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तर: शुचि:।।
68
संकल्प करून पूजा करा
यानंतर हातात जल व अक्षता घेऊन पूजा संकल्प करावा. सर्वप्रथम भगवान श्रीगणेश आणि देवी सरस्वतीला हळद -कुंकू लावून पूजा करा. यानंतर श्रीमहालक्ष्मीला हळद-कुंकू लावा व शुद्ध तुपाचा दिवा लावून धूप अगरबत्तीही दाखवा. आपल्या ईच्छेनुसार 11 किंवा 21 दिवे लावावेत.
सर्व देवांच्या प्रतिमांवर अबीर, गुलाल, हळदकुंकू, चंदन, अक्षता वाहाव्यात. फुलांचे हार अर्पण करा. अत्तर शिंपडावे व विड्याचे पानही अर्पण करावे. अशाच पद्धतीने कुबेर भगवानाचीही पूजा करावी. पूजा झाल्यानंतर फळ व मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करावी.
यानंतर अक्षता घेऊन श्रीगणेश आणि महालक्ष्मी यांची मूर्ती वगळता सर्व पूजनीय देवतांना अक्षता अर्पण करा व पुढील मंत्राचा उच्चार करावा.
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च।।
अशा प्रकारे दीपावलीची पूजा केल्यास घरातील सुख-समृद्धीत वाढ होण्यास मदत मिळेल.
78
लक्ष्मीपूजनाबद्दलची महत्त्वाची माहिती, शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ
88
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.