Hair Care : लांबसडक, मऊ व मजबूत केस हवेत? वापरा किचनमधील या साहित्यापासून तयार केलेले औषधी पाणी

Hair Care Tips : कमरेपर्यंत लांबसडक केस हवे आहेत? मग हेअर केअर रुटीनमध्ये तुमच्या किचनमधील या पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थाचा समावेश करून पाहा.

Harshada Shirsekar | Published : Nov 7, 2023 9:57 AM IST / Updated: Nov 07 2023, 03:40 PM IST
19
लांबसडक केसांसाठी रामबाण उपाय

Indian Hair Growth Secrets : काळेभोर, लांबसडक व घनदाट केस मिळवण्यासाठी महिलावर्ग कित्येक प्रकारचे उपाय करतात. पण आळस, कंटाळा किंवा वेळेअभावी या उपायांमध्ये सातत्य टिकून राहत नाही. मग झटपट उपाय करण्याच्या नादात त्या ब्युटी पार्लरमधील महागड्या व केमिकलयुक्त ट्रीटमेंट्सची मदत घेतात. पण यामुळे केसांना दीर्घकाळासाठी (How To Grow Your Hair With Rice Water) कोणतेही फायदे मिळत नाहीत.

नुकसान टाळून केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक उपचार करण्यावर भर द्यावा. नैसर्गिक उपचारांकरिता लागणारी सामग्री तुमच्या स्वयंपाकघरामध्येही सहजरित्या उपलब्ध असते. पण वेळेच कारण देऊन सर्वजण केसांची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करतात. केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून खरंच सुटका हवी आहे का? केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय म्हणजे तांदळाचे पाणी. हेअर केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा (Rice Water For Hair Benefits) समावेश करून पाहा. यापासून केसांना कोणकोणते लाभ मिळू शकतात? जाणून घेऊया सविस्तर…

29
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

केसगळतीची समस्या रोखून केसांच्या वाढीसाठी एक उत्तम उपाय म्हणजे तांदळाचे पाणी (Rice Water For Hair Growth). केसांच्या वाढीस पोषक असणारे अमिनो अ‍ॅसिड तांदळामध्ये आहे. हेअरवॉशनंतर तांदळाच्या पाण्याने केस (Healthy Hair Routine) पुन्हा धुवावेत. हा उपाय आपण आठवड्यातून दोनदा करू शकता.

(केसगळती-थकव्यामुळे आहात त्रस्त? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या सुपरफुडचे कराल सेवन तर व्हाल मस्त)

39
दुभंगलेल्या केसांची समस्या

वेगवेगळी हेअरस्टाइल तसंच केमिकलयुक्त शॅम्पूच्या वापरामुळे केस कोरडे व निर्जीव होऊ लागतात. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या निर्माण होते. परिणामी केसांची वाढ खुंटते आणि केसांवरील नैसर्गिक चमकही नाहीशी होऊ लागते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा (Rice Water For Hair Recipe) वापर करावा. कारण यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते. प्रोटीन, अमिनो अ‍ॅसिड व स्टार्चमुळे कोरड्या केसांची समस्या दूर होऊ शकते. स्प्रे बॉटलच्या मदतीने केसांना तांदळाचे पाणी (Rice Water For Hair Everyday) लावा आणि 15-20 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्यावे. काही दिवसांत केसांमध्ये सकारात्मक बदल आपणास दिसू लागतील.

49
नॅचरल कंडिशनर

शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर म्हणून आपण तांदळाच्या पाण्याचा (How To Make Rice Water For Hair Growth) वापर करू शकता. यातील औषधी गुणधर्मामुळे केस घनदाट, मजबूत व मऊ होण्यास मदत मिळेल.

(केसांची होईल भराभर वाढ, असे तयार करा जास्वंदाच्या फुलाचे तेल)

59
कोंड्यापासून मिळेल मुक्ती

केसांमध्ये कोंडा (Dandruff Treatment) होणे ही फार सामान्य समस्या आहे. पण यावर वेळीच उपाय न केल्यास केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. कोंड्यामुळे डोक्याला खाज येणे, डोक्याची त्वचा जळजळणे, पापुद्रे निघणे यासारख्या समस्या निर्माण होतात. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नियमित स्वरुपात तांदळाच्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. केसांमधील कोंडा कमी होईल शिवाय केसांवर नैसर्गिक चमकही दिसेल.

69
केसांना मिळते संरक्षण

हेअर केअर रुटीनमध्ये (Hair Care Tips) तांदळाच्या पाण्याचा (Cooked Rice Water For Hair) समावेश केल्यास स्कॅल्पला मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल. यामुळे केस मुळासह मजबूत होतील. शिवाय यातील इनोसिटोल नावाचे कार्बोहायड्रेट केसांचे संरक्षण करण्याचे कार्य करते.

79
कसे तयार करावे तांदळाचे पाणी? (How To Make Rice Water For Hair)

आपल्या आवश्यकतेनुसार तांदूळ घ्या व काही तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. यानंतर पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटलच्या मदतीने तांदळाचे पाणी केसांवर लावा व 20 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. शक्य असल्यास आपण तांदूळ रात्रभर देखील पाण्यात भिजत ठेवू शकता.

(Hair Care Tips : या लालभडक फुलाचा करा वापर, केस होतील इतके जाड-मजबूत की विंचरताना दुखतील हात)

89
तांदळाचे हेअर पॅक

मऊ व चमकदार केस (Long Hair Care Tips) मिळवण्यासाठी केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी तांदळाचे हेअर पॅक (How To Use Rice Water For Hair) वापरून पाहा. तासभरासाठी तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. यानंतर भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवावी. यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

99
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery