मोदी सरकार लवकरच इंडिया सेमीकंडक्टर रीसर्च सेंटरची स्थापना करणार, जे सेमीकंडक्टर इनोव्हेशनसाठी केंद्र म्हणून कार्य करेल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.
IESA Vision Summit 2024 : केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी (25 जानेवारी) IESA व्हिजन समिट 2024ला संबोधित केले. यावेळेस त्यांनी मोदी सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील दृष्टीकोन देखील अधोरेखित केला. आपल्या भाषणादरम्यान राजीव चंद्रशेखर यांनी घोषणा केली की, “सरकार लवकरच डिजिटल इंडिया फ्युचरलॅब्स लाँच करणार आणि इंडिया सेमीकंडक्टर रीसर्च सेंटरचीही स्थापना केली जाईल”.
इंडिया सेमीकंडक्टर रीसर्च सेंटर
राजीव चंद्रशेखर म्हणाले की, “आम्ही लवकरच इंडिया सेमीकंडक्टर रीसर्च सेंटरची स्थापना करू, जे सर्व स्पेक्ट्रममध्ये पसरलेल्या सेमीकंडक्टर इनोव्हेशनसाठी केंद्र म्हणून कार्य करेल. मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की आम्ही लवकरच डिजिटल इंडिया फ्युचरलॅब्स नावाचा आमचा आगामी कार्यक्रम सुरू करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सरकारी प्रयोगशाळा, भारतीय स्टार्टअप्स, मोठे उद्योग व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कॉर्पोरेशनचा सहभाग असेल. यामध्ये पुरवठादार आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रिअल प्लॅटफॉर्मचा (Tier 1) देखील समावेश असेल, जे भविष्याकरिता डिझाइनिंग व नवनवीन प्रणालीवर लक्ष केंद्रीत करेल".
डिजिटल इंडिया फ्युचरलॅब्स उपक्रम
“डिजिटल इंडिया फ्युचरलॅब्स उपक्रमाचा उद्देश भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी क्षेत्राला संशोधन व नावीन्यपूर्ण फ्रेमवर्क स्थापित करून यातील दर्जा, प्रणाली आणि प्लॅटफॉर्मवर नेतृत्वास चालना देणे हे आहे. जे सहकार्याद्वारे देशांतर्गत नवे उपक्रम इकोसिस्टीम मजबूत करण्यावर, त्यामध्ये वाढ करण्यावर आणि तांत्रिक प्रगतीला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करते. नोडल एजन्सी म्हणून C-DACसह futureLABS ऑटोमोटिव्ह, मोबिलिटी, कम्प्युटर, कम्युनिकेशन, स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल IoT यासारख्या क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रीत करेल. हे स्टार्टअप्स, MNCs, R&D संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये संयुक्तपणे प्रणाली, दर्जा आणि IP कोअर विकसित करण्यासाठी सहकार्य सुलभ करण्याचे काम करेल”.
यावेळेस केंद्रीय चंद्रशेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या संदर्भात मांडलेल्या दृष्टीकोनावरही प्रकाश टाकला. त्यांनी स्टार्टअप्स आणि मोठ्या उद्योगांना प्रेरणा देणारी इनोव्हेशन इकोसिस्टम स्थापन करण्याच्या भारताच्या प्रगतीबाबातही उल्लेख केला.
मुख्य उद्दिष्ट
“गेल्या अनेक वर्षांपासून नावीन्यपूर्ण स्टार्टअपला समर्थन देणे आणि विशेषत: ग्राहक इंटरनेट स्पेसमध्ये लक्षणीय यश मिळवणे हे उद्दिष्ट आहे. आम्ही मोठ्या संख्येने स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्स, गुंतवणूक व अनेक संधींची निर्मिती पाहिली आहे, जे एक नावीन्यपूर्ण इकोसिस्टीमचे वैशिष्ट्य आहे. ही इकोसिस्टीम जगभरातील सर्वात रोमांचक व वेगाने वाढणाऱ्या इकोसिस्टमपैकी एक ठरली आहे. या इनोव्हेशन इकोसिस्टीमचा विस्तार आणि आमच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेची पुनर्कल्पना म्हणून आम्ही आमच्या पंतप्रधानांकडे पाहतो, ज्यांनी आमच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टीमचा विस्तार करण्यासाठी एक फ्रेमवर्क आणि गुंतवणूक स्थापित केली आहे".
“हा सखोल टेक उपक्रम भविष्यातील प्रणाली ग्राहक, उद्योग आणि सरकार यांच्यासाठी जगभरातील वाढत्या डिजिटायझेशनद्वारे चालवलेल्या कामगिरीच्या आवश्यकता पूर्ण करेल याची खात्री देतो. ऑटोमोटिव्ह, कम्प्युटर, वायरलेस टेलिकम्युनिकेशन, औद्योगिक अनुप्रयोग, IoT आणि धोरणात्मक तंत्रज्ञानासह संपूर्ण स्पेक्ट्रमवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे”, असेही राजीव चंद्रशेखर यावेळेस म्हणाले.
आणखी वाचा :
Lok Sabha Elections 2024 : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम
Exclusive : पंतप्रधान मोदींचे कौतुक करत पी. गोपीचंद म्हणाले की, 'राम मंदिरामुळे रामराज्य येईल'