Lok Sabha Elections 2024 : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीमध्ये कोणते पक्ष आणि कोणाकडे किती सदस्य? वाचा संपूर्ण यादी

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची ताकद जनता दल (युनाइटेड) आणि तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्याने कमी झाली आहे. अशातच जाणून घेऊया इंडिया आघाडीमध्ये कोणते पक्ष आहेत आणि वर्ष 2019 मधील निवडणुकीत किती जागा मिळाल्या होत्या याबद्दल सविस्तर.....

Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचार आणि जोरदार तयारी केली जात आहे. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या उमेदवारांना उतवरणार याची यादी देखील राजकीय पक्षाकडून जारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप पक्षाने यंदाच्या निवडणुकीत 370 चा आकडा आणि एनडीने (NDA) 400 च्या पार जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

दुसऱ्या बाजूला, इंडिया आघाडीमधून जनता दल (युनाइटेड) आणि तृणमूल काँग्रेस बाहेर पडल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. जाणून घेऊया इंडिया आघाडीमध्ये आता कोणत्या राजकीय पक्षांचा समावेश आहे. याशिवाय वर्ष 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीला किती जागांवर विजय मिळाला होता याबद्दल सविस्तर....

काँग्रेस (Congress)
इंडिया आघाडीमधील काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष आहे. वर्ष 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळाला होता. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरातसह काही राज्यांमध्ये भाजपला काँग्रेस टक्कर देत आहे.

द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेतृत्व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन करत आहेत. याधीच्या सार्वत्रिक निवडणुकीत डीएमके पक्षाला 24 जागांवर विजय स्विकारावा लागला होता. डीएमके तमिळनाडू विधानसभेतील सर्वाधिक मोठा पक्ष आहे.

आम आदमी पक्ष (AAP)
आम आदमी पार्टीचे नेतृत्व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. दरम्यान, लोकसभेत पक्षाचा एकच खासदार आहे.

राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal)
राष्ट्रीय जनता दल बिहारमधील पक्ष आहे. बिहार विधानसभेत पक्षाच्या आमदारांची संख्या 75 आहे. याशिवाय राज्यसभेत सहा खासदार असून लोकसभेत एकही खासदार नाहीत.

समाजवादी पक्ष
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत. यांच्याकडे लोकसभेचे तीन खासदार आहेत.

कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI)
वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 49 जागा लढल्या आणि केवळ दोन जागांवर विजय मिळवला.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M)
भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) वर्ष 2019 मध्ये 71 जागांवर निवडणुक लढली होती. पण पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला होता.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिब्रेशन (CPI-ML)
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिब्रेशनकडे लोकसभेत एकही खासदार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)
गेल्या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फुटीचा सामना करावा लागला होता. पक्षात फुट पडण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पाच जागा मिळाल्या होत्या. सधया लोकसभेत शरद पवारांच्या गटाकडे तीन खासदार आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गट (UBT)
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे सहा खासदार आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा यांच्याकडे लोकसभेची एक जागा आहे.

अपना दल (कमेरावाडी)
अपना दल (कमेरावाडी) यांच्याकडे लोकसभेसाठी एकही जागा नाही.

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष (Jammu & Kashmir National Conference)
माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने वर्ष 2019 मधील निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवला होता.

इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)
इंडियन युनियन मुस्लीम लीगकडे लोकसभेत तीन खासदार आहेत.

रिवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP)
रिवॉल्यूशनरी सोशलिस्ट पार्टीकडे लोकसभेत एकच खासदार आहेत.

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉककडे एकही खासदार नाही.

मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (Marumalarchi Dravida Munnetra Kazhagam)
मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम पक्षाकडे लोकसभेतील एकही जागा नाही.

विदुथलाई चिरुथाईगल काची (Viduthalai Chiruthaigal Katchi)
विदुथलाई चिरुथाईगल काचीमध्ये लोकसभेत एकच खासदार आहे.

कोंगुनाडू मक्कल देसिया काची (Kongunadu Makkal Desiya Katchi)
कोंगुनाडू मक्कल देसिया काची पक्षाकडे लोकसभेचा एकही सदस्य नाही.

मनिथनेय मक्कल काची (Manithaneya Makkal Katchi)
मनिथनेय मक्कल काची पक्षाचे नेतृत्व एम. एच. जवाहिरुल्ला करत आहेत. पक्षाकडे लोकसभेचा एकही सदस्य नाही.

केरळ काँग्रेस (मणि)
केरळ काँग्रेस (मणि) यांच्याकडे लोकसभेतील एक जागा आहे.

केरळ काँग्रेस (जोसेफ)
केरळ काँग्रेस (जोसेफ) पक्षाकडे लोकसभेतील एकही जागा नाही.

आणखी वाचा : 

Postal Ballots च्या आधारे मतदान करण्याच्या नियमात बदल, 85 वर्षांपेक्षा कमी वयातील नागरिकांना घरबसल्या मत देता येणार नाही

अमित शहांपासून ते नितीन गडकरींपर्यंत भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या नावांसोबत 'मोदींचे कुटुंब' असे म्हटले, काय आहे कारण?

Bribes for Vote Case : पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांवर खटला दाखल होणार, सुप्रीम कोर्टाने सुनावला ऐतिहासिक निर्णय

Read more Articles on
Share this article