ICU New Guidelines : अतिदक्षता विभागात रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी

एखाद्या रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करण्यासंदर्भात रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर.....

Chanda Mandavkar | Published : Jan 3, 2024 4:42 AM IST / Updated: Jan 03 2024, 10:19 AM IST

ICU New Guidelines : रुग्णालयांसाठी अतिदक्षता विभागासंदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अशातच एखाद्या अतिगंभीर रुग्णाला नातेवाईकांच्या इच्छाविरोधात रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करता येणार नाहीय. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अतिदक्षता विभागाबद्दलच्या नव्या नियमावलीत म्हटले आहे की, गंभीर आजारी असणाऱ्या रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी अतिदक्षता विभागात भरती करण्यास नकार दिला तर रुग्णालय त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही.

सर्वसामान्यपणे पाहिले जाते की, काही खासगी रुग्णालये आपले बिल वाढवण्यासाठी कमी आजारी असलेल्या रुग्णाला देखील अतिदक्षता विभागात भरती करतात. यामुळे रुग्णालयाचे बिल वाढले जाते आणि रुग्णाच्या नातेवाईकांसमोर बिलाची रक्कम कशी भरायची असा प्रश्न देखील उपस्थितीत होतो. हीच प्रकरणे लक्षात घेता आता आरोग्य मंत्रालयाकडून महत्त्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे.

देशात पहिल्यांदा अतिदक्षता विभागासाठी जारी नियमावली
सरकारकडून देशात पहिल्यांदाच रुग्णालयातील अतिदक्षता विभागाअंतर्गत रुग्णाच्या गरजेच्या आधारावर निर्णय घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. बहुतांश विकासित देशांमध्ये अतिदक्षता विभागात करण्यात येणाऱ्या उपचारासाठी खास प्रोटोकॉल आहे.

काय म्हटलेय नियमावलीत?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले की, गंभीर आजारी रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी त्याला अतिदक्षता विभागात भरती करण्यास रुग्णालयाला नकार दिल्यास रुग्णालय त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत.

वरिष्ठ डॉक्टरांच्या पॅनलकडून नियमावली तयार
आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेली नियमावली मुख्य रूपात वरिष्ठ डॉक्टरांच्या एका पॅनलने तयार केली आहे. या पॅनलने आरोग्यासंबंधित अशा स्थितींची एक यादी तयार केली आहे ज्यामध्ये रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करण्याची गरज भासेल.

पॅनलमधील डॉक्टरांच्या मते, रुग्णालयातील अतिदक्षता विभागात संसाधने मर्यादित प्रमाणात असतात. यामुळे या विभागात सामान्य रुग्णाला भरती करू नये. अतिआवश्यक प्रकरणातच रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करावे.

याशिवाय डॉक्टरांच्या एक्सपर्ट पॅनलने आरोग्य मंत्रालयाला दिलेल्या सल्ल्यात हे देखील म्हटले आहे की, अशा प्रकारच्या पावलामुळे रुग्णालय आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधील पारदर्शकता वाढेल. रुग्णाच्या नातेवाईकांना हे वाटणार नाही की, रुग्णालय जबरदस्तीने रुग्णाला अतिदक्षता विभागात भरती करुन त्यांचे बिल वाढवण्याचे काम करत आहे.

आणखी वाचा: 

Hit And Run New Law : देशभरात बस, ट्रकसह वाहन चालकांचे आंदोलन, जाणून घ्या नव्या 'हिट अ‍ॅण्ड रन' कायद्याबद्दल सविस्तर...

WWEच्या रिंगणामध्ये सलवार-सूट परिधान करून कुस्ती करणाऱ्या लेडी खली, कोण आहेत कविता देवी?

राम मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणार ही 7 मंदिरे

Share this article