Ram Mandir
Marathi

Ram Mandir

राम मंदिराच्या परिसरात उभारण्यात येणार ही 7 मंदिरे

रामललांची प्राणप्रतिष्ठा
Marathi

रामललांची प्राणप्रतिष्ठा

येत्या 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिराव्यतिरिक्त आणखी सात मंदिरे उभारण्यात येणार आहेत.

Image credits: social media
राम मंदिर परिसरातील मंदिरे
Marathi

राम मंदिर परिसरातील मंदिरे

राम जन्मभूमी परिसरात ब्रम्हर्षी वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी वाल्मिकी, अगस्त्य ऋषी, भक्त केवट, निषादराज आणि माता शबरी यांची मंदिरे उभारण्यात येणार आहेत.

Image credits: social media
ब्रम्हर्षी वशिष्ठ
Marathi

ब्रम्हर्षी वशिष्ठ

ब्रम्हर्षी वशिष्ठ यांचे देखील मंदिर उभारले जाणार आहे. ते रामललांचे कुलगुरू होते. श्रीराम, लक्ष्मण यांच्यासह चार भावंडांची नावे ब्रम्हर्षी वशिष्ठ यांनी ठेवली होती.

Image credits: adobe stock
Marathi

ब्रम्हर्षी विश्वामित्र

राक्षसांचा अंत करण्यासाठी राम-लक्ष्मण आपल्यासोबत ब्रम्हर्षी विश्वमित्रांना घेऊन गेले होते. विश्वामित्रांनीच श्रीरामांना दिव्य अस्र दिले होते.

Image credits: adobe stock
Marathi

महर्षी वाल्मिकी

महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिले आहे. वाल्मिकी यांच्या आश्रमातच लव आणि कुश यांचा जन्म झाला होता.

Image credits: adobe stock
Marathi

अगस्त्य ऋषी

सप्तऋषींपैकी एक अगस्त्य ऋषी आहेत. वनवासादरम्यान श्रीराम अगस्त्य ऋषींच्या आश्रमातही गेले होते. श्रीरामांना अगत्य ऋषींनी काही दिव्य अस्रही दिली होती.

Image credits: adobe stock
Marathi

भक्त केवट

वनवासादरम्यान श्रीरामांना गंगा नदी पार करायची होती. त्यावेळी भक्त केवट यांनी श्रीरामांना आपल्या होडीत बसवले होते. केवट यांनी श्रीरामांचे चरणही धुतले होते.

Image credits: social media
Marathi

निषादराज

वनवासादरम्यान श्री राम श्रृंगवेरपूर नावाच्या ठिकाणी थांबले होते. राजा निषादराज यांनी श्रीरामांचा आदर-सत्कार केला होता. निषादराज श्रीरामांचे भक्त होते. 

Image credits: social media
Marathi

शबरी माता

वनवासादरम्यान सीतेचा शोध घेत श्रीराम शबरी मातेच्या आश्रमात आले होते. शबरी मातेने श्रीरामांना सुग्रीव यांच्याबद्दल सांगितले होते.

Image credits: social media

अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पाहा PHOTOS

अयोध्येतील विमानतळाचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Ayodhya : राम मंदिराचे खास फोटो, रात्रीचा नजारा पाहून मन होईल प्रसन्न

AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?