26th July 2025 Updates : इस्रोचे येत्या 30 जुलैला मिशन निसार पार पडणार असल्याची माहिती इस्रोचे चेअरमन डॉ. वी नारायण यांनी दिली आहे. याशिवाय कारगिल युद्धा शहीद झालेल्या भारताच्या जवानांना आज कारगिल विजय दिनानिमित्त आदरांजली वाहिली जात आहे. तर महाराष्ट्रातील पालघरमध्ये आज मुसळधार पावासाचा अंदाज आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच ताज्या घडामोडी एशियानेट न्यूजवर एका क्लिकवर वाचा.

11:35 PM (IST) Jul 26
मुंबई - आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या सितारे जमीन पर या चित्रपटाने कोणताही गाजावाजा न करता बक्कळ कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २६८ कोटींचा गल्ला कमावला आहे.
11:29 PM (IST) Jul 26
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४,२९८ पुरुष आणि अनेक अपात्र महिलांनी घेतल्याची शक्यता आहे. या सरकारी फसवणुकीमुळे तिजोरीला मोठा फटका बसला असून, आता प्रश्न असा आहे की, या लोकांवर काय कारवाई होणार आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाईल का?
11:14 PM (IST) Jul 26
जसप्रीत बुमराहने इंग्लंडमधील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या इशांत शर्माच्या विक्रमाची बरोबरी करत नवा इतिहास रचला. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत त्याने चौथ्या दिवशी ३३ षटकांत २/११२ अशी कामगिरी केली.
08:00 PM (IST) Jul 26
Mumbai Pune Expressway Container Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने २० हून अधिक वाहनांना धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. हा अपघात खोपोलीजवळ घडला असून, वाहतूक ठप्प झाली आहे.
07:20 PM (IST) Jul 26
मुंबई - १२ वी नंतर काय करायचं याबद्दल गोंधळला आहात? टेक, व्यवसाय, आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रातील हे ६ भविष्यकालीन पदवी पर्याय एक्सप्लोर करा. मागणी असलेल्या कौशल्यांसह यशस्वी करिअर मिळवा. आत्ताच क्लिक करा!
07:12 PM (IST) Jul 26
06:51 PM (IST) Jul 26
05:27 PM (IST) Jul 26
मुंबई - गणेशोत्सव सुरु होण्याला साधारणपणे एक महिना असला तरी आतापासून ढोल-ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस सुरु झाली आहे. त्यामुळे सायंकाळ झाली की कानांवर ढोल-ताशांचे आवाज पडत आहेत. ढोल-ताशा वाजवण्याचे काही आरोग्यदारी फायदेही आहेत. जाणून घ्या..
03:20 PM (IST) Jul 26
मुंबई - या राखीला, बहिण भावाच्या प्रेमाची गोडी साजरी करा. घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांनी रक्षाबंधन साजरे करा. पारंपरिक आवडत्या पदार्थांपासून ते आधुनिक पदार्थांपर्यंत तुम्ही कोणतीही रेसिपी बनवू शकता. तर जाणून घेऊयात या एकापेक्षा एक सरस रेसिपीज..
02:56 PM (IST) Jul 26
जॉर्जिया - २०२५ च्या महिला चेस वर्ल्ड कपमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात पूर्णपणे भारतीय अंतिम सामना होणार आहे. दोन भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे, जी महिला चेसमध्ये भारताचे वर्चस्व दर्शवते.
02:15 PM (IST) Jul 26
मुंबई - आहान पांडे आणि अनित पड्डाचा 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट २०२५ मधील एका चित्रपटाचा अपवाद वगळता सर्व चित्रपटांना मागे टाकत आहे. ८व्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती जाणून घ्या.
01:18 PM (IST) Jul 26
मुंबई - दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा पौराणिक अॅक्शन ड्रामा ‘महावतार नरसिंह’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली आहे. या चित्रपटातील अॅनिमेशन आणि कथानक प्रक्षेकांच्या पसंतीस उतरताना दिसून आहे. जाणून घ्या याबद्दल..
12:38 PM (IST) Jul 26
गणेशोत्सवावेळी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची गर्दी फार वाढली जाते. अशातच कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेल्या कोलाड आणि अंजनी रेल्वे स्थानकांचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
10:35 AM (IST) Jul 26
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोनं आणि चांदीचे दर आता घसरत आहेत. एकीकडे 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असताना, चांदीचे दर देखील कमी झाले. गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी असू शकते, पण बाजारातील अस्थिरतेमुळे सावधगिरीही बाळगावी लागेल.
10:05 AM (IST) Jul 26
मुंबई - अहान पांडेचा हिंदी चित्रपट 'सैयारा' आणि पवन कल्याणचा तेलुगू चित्रपट 'हरि हर वीर मल्लू' यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, साउथ सुपरस्टार विजय सेतुपतीचा तमिळ चित्रपट 'थलाइवन थलाइवी' ने केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री घेतली आहे.
09:56 AM (IST) Jul 26
मनसेकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला मराठीत फलक आणि मेन्यू कार्ड हवेत असा इशारा दिला आहे. याशिवाय गुजराती भाषेतील पाट्या काढून टाकत त्या बदलण्यासही सांगितले.
09:05 AM (IST) Jul 26
देशात आज 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, हा दिवस भारतीय सैन्याचे धाडस, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सपूतांना आदरांजली वाहिली आहे.
08:44 AM (IST) Jul 26
मुंबई - १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेले कारगिल युद्ध हे आधुनिक भारताच्या लष्करी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण व तेजस्वी पर्व आहे. हे युद्ध जम्मू-काश्मीरमधील कारगिल एलओसी जवळ झाले होते. आज या युद्धाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
08:37 AM (IST) Jul 26
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशातच पुढील 24 तासही धोक्याचे असून हवामान खात्याने काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या आजचे हवामान खात्याचे ताजे अपडेट्स
08:29 AM (IST) Jul 26
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी आणि पहिल्या शनिवारी कसे असेल तुमचे राशिभविष्य ते जाणून घ्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनिक भविष्य इथे वाचा. हे भविष्य २६.०७.२०२५ शनिवारचे आहे.