कॅनडामध्ये पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाने सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळेल का हे अजून स्पष्ट नाही. कार्नी यांनी ट्रम्प यांना आव्हान देत विजय मिळवला आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे.
स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक, ट्रॅफिक सिग्नल आणि विमानसेवा ठप्प झाल्या. फ्रान्सच्या काही भागातही याचा परिणाम झाला.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कडक भूमिकेमुळे बिलावल भुट्टो संतापले आहेत. त्यांनी सिंधू जल करारावर वादग्रस्त विधान केले आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इसहाक डार यांनी हल्लेखोरांना 'स्वातंत्र्यसैनिक' म्हटले आहे. भारताने इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केल्यानंतर आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केल्यानंतर तणाव वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दाखल झाले. त्यांचे २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले आणि रॉयल सौदी अरेबियाच्या फायटर विमानांनी त्यांच्या विमानाला एस्कॉर्ट केले.
जेद्दाहमधील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या भारतीय समुदायाने 'सारे जहां से अच्छा' हे गाणे गायले. सौदी अरेबियातील त्यांच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करण्यास ते आनंदी आणि अभिमानी असल्याचे अनेकांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सौदी हवाई दलाच्या F15s द्वारे खास सन्मान देण्यात आला. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर सौदी अरेबियात आहेत.
PM Modi Visit to Saudi Arabia : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसीय सौदी अरेबिया दौऱ्यापूर्वी, भारत आणि सौदी अरेबियामधील संबंधांची ताकद आणि "अमर्याद क्षमता" यावर भर दिला आहे.
PM नरेंद्र मोदी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हॅन्स यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या जनतेच्या कल्याणा केंद्रित या कराराबाबत लक्षणीय प्रगती झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
Pope Francis Death: पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी वेटिकनने दिली आहे. १३८ कार्डिनल नवीन पोपची निवड करतील, यात भारताचे चार कार्डिनलही मतदान करतील. जाणून घ्या कोण आहेत हे भारतीय कार्डिनल.
World