मॅकेन्झी स्कॉट यांनी विकले 8 अब्ज डॉलर्सचे अमेझॉन शेअर्सलेखिका आणि समाजसेविका मॅकेन्झी स्कॉट यांनी त्यांच्याकडे असलेले अमेझॉन कंपनीचे ११% शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ८ अब्ज अमेरिकन डॉलर (₹६७,५३८ कोटी) आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३८ अब्ज डॉलरवरून ३० अब्ज डॉलरवर आली आहे.