सार

लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेत रस्त्यावर दहशत माजवली असून अनेकांना त्याने भोसकले असल्याचं म्हंटल जात आहे. हेअरनॉट स्टेशनजवळ सकाळी हा प्रकार घडला आहे.

Mass Stabbing In London :  लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेत रस्त्यावर दहशत माजवली असून अनेकांना त्याने भोसकले असल्याचं म्हंटल जात आहे. हेअरनॉट स्टेशनजवळ सकाळी हा प्रकार घडला आहे. यामध्ये दोन पोलिसांसह अनेक नागरिक गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मंगळवारी झालेल्या या हृदयद्रावक घटनेची माहिती देताना महानगर पोलिसांनी सांगितले की, अनेकांवर तलवारीने हल्ला करून जखमी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लंडनच्या पूर्वेकडील हेनॉल्टमध्ये त्याला तलवारीसह अटक करण्यात आली आहे. सकाळी सातच्या आधी एक व्यक्ती धारदार शस्त्राने लोकांवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आणि त्याला अटक करण्यात यश आले आहे.

डेप्युटी पोलीस कमिशनर अडे अडेलेकन हे म्हणाले की, सदर घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं आणि आरोपीने कोणत्या कारणासाठी असं कृत्य केलं हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. पण, तुर्तास यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत आहोत. लवकरात लवकर यासंदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात येईल. मात्र, सदर घटनेमध्ये दहशतवादाची शक्यता नाही. शिवाय यामध्ये इतर व्यक्तींचा देखील समावेश नाही.

डेप्युटी पोलीस कमिशनर अडे अडेलेकन हे म्हणाले की, सदर घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं आणि आरोपीने कोणत्या कारणासाठी असं कृत्य केलं हे सर्वांना जाणून घ्यायचं आहे. पण, या संदर्भात आम्ही अधिक तपास करत आहोत. लवकरात लवकर यासंदर्भातील माहिती नागरिकांना देण्यात येईल. मात्र, सदर घटनेमध्ये दहशतवादाची शक्यता नाही. शिवाय यामध्ये इतर व्यक्तींचा देखील समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे