Cruelty of Soldier: वेस्ट बँकमध्ये रस्त्याच्या कडेला नमाज पठण करणाऱ्या पॅलेस्टिनी तरुणाला इस्रायली सैनिकाने ऑफ-रोड वाहनाने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निषेध झाला आणि त्या सैनिकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Cruelty of Soldier: जेरुसलेम: सारे जग अस्थिरतेशी सामना करीत असताना इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या लढ्याने या अस्थिरतेत आणखी एक अधिक तीव्रतेची धोकायदायक भर पडली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी, पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी इस्रायलवर अचानक हल्ला केला . या हल्ल्यात 1 हजार 143 नागरिक मारले गेले. याचा बदला म्हणून इस्रायलने गाझा युद्धाला सुरूवात केली. इस्रायलने गाझा पट्टीवर बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले आणि आक्रमण सुरू केले ज्यामुळे डिसेंबर 2025 पर्यंत 62 हजारांहून अधिक नागरिक मारले गेले. सध्या युद्धाची तीव्रता कमी झाली असली तरी युद्ध पूर्णपणे संपलेले नाही याचाच प्रत्यय वेस्ट बॅेकमध्ये आला.

रस्त्याच्या कडेला नमाज पठण करणाऱ्या तरुणावर ऑफ-रोड वाहन चढवण्यात आले. ही घटना वेस्ट बँक येथील आहे. एका इस्रायली सैनिकाने पॅलेस्टिनी तरुणाला वाहनाने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत आहे.

घटनेच्या वेळी इस्रायली सैनिक गणवेशात नव्हता, पण त्याच्याकडे बंदूक होती. व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात निषेध झाल्यानंतर, इस्रायलने सांगितले की सैनिकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याचे शस्त्र जप्त केले आहे. दरम्यान, जखमी पॅलेस्टिनी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पॅलेस्टिनी टेलिव्हिजनने याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर निषेध वाढला. वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनींवर इस्रायली सैनिकांच्या अत्याचाराचा हा एक नवीन पुरावा आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने एका निवेदनात सैनिकाच्या कृतीला गंभीर उल्लंघन म्हटले आहे.

Scroll to load tweet…