MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Artemis II: अंतराळातून पृथ्वी दिसते तरी कशी? पाहा NASA ने प्रसिद्ध केलेले फोटो

Artemis II: अंतराळातून पृथ्वी दिसते तरी कशी? पाहा NASA ने प्रसिद्ध केलेले फोटो

Artemis II: नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांनी जवळपास 50 वर्षांनी चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. हा प्रवास करताना अंतराळातून आपल्या पृथ्वीचे काही अद्भुत फोटो त्यांनी पाठवले आहेत. हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 04 2026, 09:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नासाची आर्टेमिस 2 मोहीम
Image Credit : Nasa

नासाची आर्टेमिस 2 मोहीम

नासा आणि इस्रोने याआधीही अंतराळातून पृथ्वीचे अनेक फोटो काढले आहेत. आता नासाची आर्टेमिस २ मोहीम चंद्राच्या दिशेने निघाली आहे. या प्रवासादरम्यान अंतराळवीरांनी पृथ्वीचा हा सुंदर फोटो पाठवला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नासाने शेअर केले दोन फोटो
Image Credit : nasa

नासाने शेअर केले दोन फोटो

आर्टेमिस 2 मोहिमेचे अंतराळवीर 'ओरायन कॅप्सूल' या यानातून प्रवास करत आहेत. नासाने शेअर केलेल्या दोन फोटोंपैकी हा पहिला फोटो आहे. यात यानाच्या खिडकीतून पृथ्वीचा काही भाग दिसत आहे.

35
दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण पृथ्वी
Image Credit : Nasa

दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण पृथ्वी

दुसऱ्या फोटोमध्ये संपूर्ण पृथ्वी दिसत आहे. निळ्या रंगाच्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर पसरलेली दिसते. काही ठिकाणी हिरवागार भागही दिसतोय. संशोधकांसाठी अभ्यासाच्या दृष्टीने हा फोटो खूप महत्त्वाचा आहे.
45
मिशन कमांडर रीड वाइसमन यांचा अनुभव
Image Credit : our own

मिशन कमांडर रीड वाइसमन यांचा अनुभव

मिशन कमांडर रीड वाइसमन यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. ते म्हणाले, 'आपलं घर, आपली पृथ्वी इतक्या उंचीवरून पाहणं खूप आनंददायक आहे. सूर्याच्या प्रकाशात ती खूप सुंदर चमकत आहे.'
55
आर्टेमिस 2 मोहीमेबद्दल...
Image Credit : ANI

आर्टेमिस 2 मोहीमेबद्दल...

आर्टेमिस 2 मोहीम सुमारे 10 दिवस चालणार आहे. 1 एप्रिल रोजी चार अंतराळवीरांची टीम या प्रवासाला निघाली. ही टीम चंद्राला जवळून प्रदक्षिणा घालून परत येणार आहे, ते चंद्रावर उतरणार नाहीत. लवकरच ही टीम चंद्राजवळचे फोटोही पाठवेल अशी अपेक्षा आहे.

About the Author

MD
Marathi Desk 1
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Leandro Paredes: मेसीपाठोपाठ अर्जेंटिनाचा आणखी एक स्टार खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला...
Recommended image2
Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलय, मृतांचा आकडा १,२०४ वर; ३,९०० जण अजूनही बेपत्ता
Recommended image3
Nepal Floods : नेपाळमध्ये महापुराचा कहर, मृतांचा आकडा ११२७ वर; भारतातही सापडले मृतदेह
Recommended image4
US-Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर; लग्नाच्या वरातीत 50 जणांचा मृत्यू?
Recommended image5
Nepal Flood: महाप्रलयात अख्खं गाव वाहून गेलं, पण ४० वर्षे जुनं हिरवं घर तसंच उभं! काय आहे रहस्य?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved