Artemis 2 Crew Breaks Apollo 13 Record : तब्बल ५४ वर्षांनी माणसाने चंद्राच्या पलीकडून प्रवास करत इतिहास रचला आहे. आर्टेमिस-२ मोहिमेतील अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सर्वात दूर जाण्याचा अपोलो-१३ चा विक्रम मोडला आहे.

Artemis 2 Crew Breaks Apollo 13 Record : तब्बल ५४ वर्षांनंतर चंद्राच्या पलीकडे प्रवास करण्याचा मानवी विक्रम आर्टेमिस-२ टीमने आपल्या नावावर केला आहे. चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या 'ओरियन' यानाचा पृथ्वीशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आहे. यासोबतच, या मोहिमेतील चार अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सर्वात जास्त अंतर गाठण्याचा नवा विक्रम केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

या टीमने पृथ्वीपासून तब्बल ४,०६,७७१ किलोमीटर अंतर गाठलं. भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३७ वाजता हा नवीन विक्रम रचला गेला. यापूर्वी १९७० साली १४ एप्रिल रोजी अपोलो-१३ च्या टीमने केलेला विक्रम आता मोडला गेला आहे.

भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३२ वाजता ओरियन यान चंद्राच्या सर्वात जवळ पोहोचलं होतं. यानंतर पृथ्वीवर पहिला संदेश पाठवला तो क्रिस्टीना कुक यांनी. १९७२ नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात पोहोचला आहे. यानंतर टीमने चंद्राच्या पलीकडून पृथ्वी आणि चंद्र दोघांनाही पाहिलं. ओरियन यान चंद्राच्या मागे गेल्यामुळे त्याचा पृथ्वीशी तब्बल ४० मिनिटं संपर्क तुटला होता. या काळात टीमने चंद्राच्या दुसऱ्या बाजूने सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवला.

आता मोहिमेच्या सातव्या दिवसाच्या मध्यावर टीमच्या पृथ्वीकडे परतण्याच्या प्रवासाला सुरुवात होईल. आठव्या दिवशी यानाचं नियंत्रण पुन्हा पायलटकडे दिलं जाईल. नवव्या दिवशी पृथ्वीवर परत उतरण्याची तयारी सुरू होईल आणि दहाव्या दिवशी ओरियन यान पृथ्वीवर उतरेल.