- Home
- Utility News
- Winter Health : वजन कमी करायचंय?, पण गोडसुद्धा खावंसं वाटतंय... तर मग 'हे' आहेत उत्तम पर्याय
Winter Health : वजन कमी करायचंय?, पण गोडसुद्धा खावंसं वाटतंय... तर मग 'हे' आहेत उत्तम पर्याय
Weight Loss : हिवाळ्यात अनेक लोकांना नेहमी एनर्जी कमी असल्यासारखं वाटतं. त्यामुळे जास्त गोड खाण्याची इच्छा होते. मात्र, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बाब योग्य नाही. त्यामुळे तुम्ही हे गोड आणि हेल्दी पदार्थ खाऊ शकता.

वजन कमी करणे
आजकाल वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे बरेच लोक आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, हिवाळ्यात वजन कमी करणे थोडे कठीण असते. कितीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी गोड खाण्याची इच्छा होतेच. ही इच्छा नियंत्रित न करता आल्याने आपण गोड पदार्थ खातो. त्यामुळे वजन कमी करणे शक्य होत नाही. तुम्हालाही हीच समस्या असेल तर गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ते वजन कमी करण्यासही मदत करतात. चला तर मग हे पदार्थ नेमके कोणते आहेत, ते पाहूयात.
१. रताळे -
या हंगामात रताळी भरपूर मिळतात. ती गोड खाण्याची इच्छा कमी करतात. यातील फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. ते गोड असल्याने वेगळे गोड पदार्थ खाण्याची गरज भासत नाही.
२. खजूर -
वजन न वाढवता गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी खजूर उत्तम आहे. यात नैसर्गिक साखर आणि फायबर भरपूर असते. याने ऊर्जा मिळते आणि गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते.
३. नट्स आणि बिया -
बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि जवस खा. यात हेल्दी फॅट्स व प्रथिने असतात. हे पचन सुधारून साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.
४. सीताफळ -
हिवाळ्यात सीताफळ सहज मिळते. यातून नैसर्गिक गोडवा मिळतो. भूक भागते आणि आरोग्यही सुधारते.
५. दालचिनी -
दालचिनी रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते. चहा किंवा दुधात मिसळून प्या. गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते.
डार्क चॉकलेट
६. डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे खाऊ शकता. यामुळे गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात राहते. यात हृदयासाठी चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात. मात्र, ते प्रमाणात खावे.
७. ओट्स -
ओट्समधील फायबर वजन कमी करण्यास मदत करते. गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते. यात फळे किंवा नट्स मिसळून खाऊ शकता.
८. दही -
दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात. यात फळे किंवा नट्स घालून खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते.