- Home
- Utility News
- Diwali Gifts : दिवाळीला कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट्स देणाऱ्या कंपन्या कोणत्या? अंबानी, अदानी यांनी काय दिलं?
Diwali Gifts : दिवाळीला कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट्स देणाऱ्या कंपन्या कोणत्या? अंबानी, अदानी यांनी काय दिलं?
Diwali Gifts: भारतात दिवाळीला अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट्स दिले. मात्र, काही कंपन्यांनी थेट कार, सोने आणि आयफोन गिफ्ट म्हणून दिले. अशा कंपन्यांबद्दल येथे माहिती दिली आहे.

दिवाळीला महागडे गिफ्ट्स
दिवाळीचा सण आला की कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि भेटवस्तूंची चर्चा सुरू होते. देशातील लहान-मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी विविध गिफ्ट्स जाहीर करतात. सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया (हरे कृष्ण एक्सपोर्ट्स) यांनी यापूर्वी कर्मचाऱ्यांना शेकडो कार आणि घरे/फ्लॅट्स गिफ्ट करून चर्चेत आले होते. हरियाणामधील एमआयटीएस (MITS) हेल्थकेअर ग्रुपने चांगल्या कामगिरीसाठी कर्मचाऱ्यांना किया सोनेट (Kia Sonet) कार्स गिफ्ट केल्या. राजस्थानमधील मीडियागार्ह (Mediagarh) सारख्या कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांना टाटा हॅरियर आणि ह्युंदाई कार्स दिल्या.

दिवाळीला आयफोन्स गिफ्ट
दिल्लीतील फायनान्शिअर साब या कंपनीने कर्मचाऱ्यांना आयफोन 16 फोन्स गिफ्ट दिले. प्रत्येकाची किंमत सुमारे 70,000 रुपये आहे. गुजरातच्या सुरत शहरातील कापड व्यापारी राम स्वरूप यांनी दिवाळीला 20 कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली. काही कंपन्यांनी 20 ग्रॅम सोने, एअर फ्रायर्स आणि कॉफी मशीन्स दिल्या.
अंबानी, अदानी यांनी काय दिले?
देशातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्या दिवाळीला काय गिफ्ट्स देतात याची सर्वांना उत्सुकता असते. मात्र, ते कार किंवा घरांसारख्या महागड्या वस्तू देण्याला प्राधान्य देत नाहीत. रिलायन्स आणि अदानी ग्रुपमध्ये लाखो कर्मचारी काम करतात हे त्याचे मुख्य कारण आहे. फेस्टिव्हल अलाउन्स, कामगिरीवर आधारित बोनस, कंपनी स्टोअरसाठी विशेष डिस्काउंट कूपन्स आणि प्रीमियम स्वीट बॉक्सेस दिले जातात. या कंपन्या प्रामुख्याने थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यावर भर देतात.
