- Home
- Utility News
- सर्वांसाठी महत्त्वाची माहिती! तुमचा फोन हॅक झाल्यास आधी काय करावे?, सर्वकाही जाणून घ्या
सर्वांसाठी महत्त्वाची माहिती! तुमचा फोन हॅक झाल्यास आधी काय करावे?, सर्वकाही जाणून घ्या
तुमचा फोन हॅक झाल्यास काय करावं, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा फोन हॅक झाल्याचं लक्षात आल्यास, ताबडतोब काही महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या बँक खात्याच्या माहितीसह इतर डेटा लीक होऊ शकतो.

1. तुमच्या वित्तीय संस्थांशी संपर्क साधा
तुमच्या खात्यांमध्ये कोणी घुसखोरी केली नाही ना, याची खात्री करण्यासाठी सर्वात आधी तुमची बँक, क्रेडिट कार्ड आणि इतर वित्तीय संस्थांशी संपर्क साधा.
2. तुमचे पासवर्ड त्वरित बदला
सर्व पासवर्ड ताबडतोब नवीन आणि मजबूत ठेवा. हॅक झालेल्या फोनशी जोडलेल्या सर्व ॲप्स आणि वेबसाइट्ससाठी हे करणे आवश्यक आहे.
3. संशयास्पद ॲप्स काढून टाका
तुमच्या फोनमधील सर्व ॲप्स तपासा आणि कोणतेही संशयास्पद किंवा अनोळखी ॲप्स काढून टाका. ॲप्स यशस्वीरित्या काढले आहेत की नाही हे पाहण्यासाठी फोन रीस्टार्ट करून पुन्हा तपासा.
4. फोन फॅक्टरी रीसेट करा
खूप पॉप-अप किंवा मालवेअर ॲप्स दिसत असल्यास आणि तुमचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास, फोन फॅक्टरी रीसेट करा. पण यामुळे सर्व डेटा नष्ट होईल, त्यामुळे हा शेवटचा उपाय म्हणून वापरा.
5. तुमच्या मित्रांना माहिती द्या
तुमचा फोन हॅक झाल्याची माहिती तुमच्या मित्रांना आणि इतर संपर्कांना द्या. तुमच्या फोनवरून येणारे कोणतेही संशयास्पद मेसेज दुर्लक्षित करण्यास किंवा डिलीट करण्यास सांगा.
6. सायबर सेलशी संपर्क साधा
फोन हॅक झाल्याचा संशय आल्यास, खात्री करण्यासाठी सायबर तज्ञ किंवा सायबर सेलशी संपर्क साधा. आर्थिक नुकसान किंवा डेटा लीक झाल्यास, शक्य तितक्या लवकर सायबर सेलला कळवा.

