विजय सेल्सच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आयफोन 17 वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. 5,000 इन्स्टंट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्सचा फायदा घेऊन हा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. याशिवाय इतर ब्रँड्सच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही शानदार ऑफर्स आहेत.
मुंबई : तुमचा मोबाईल जुना झालाय का? नवा फोन घेण्याचा विचार करताय? आयफोन खरेदी करायची इच्छा आहे का? तर मग ॲपल कंपनीचा आयफोन 17 खरेदी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आयफोन 17 च्या किमतीत मोठी कपात झाली असून, तो आता आधीपेक्षा खूपच स्वस्त झाला आहे.
आयफोन 17 बाबत ही नवीन अपडेट आली आहे. विजय सेल्सने आपला ब्लॅक फ्रायडे सेल सुरू केला असून, त्यात ॲपलचे फोन्स, लॅपटॉपसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भन्नाट ऑफर्स दिल्या आहेत. यामुळे आयफोन 17 वरही विशेष सूट मिळत आहे. यात बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक आणि व्हॉचर्ससह अनेक फायदे तुम्ही मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आयफोन 17 ची किंमत किती आहे आणि त्यावर कोणकोणत्या ऑफर्स आहेत.
आयफोन 17 वर 13,000 रुपयांपर्यंतची बचत
विजय सेल्सच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ॲपल आयफोन 17 च्या 256GB मॉडेलची किंमत ₹93,490 ठेवण्यात आली आहे. या किमतीवर ग्राहकांना ₹5,000 चा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. जर तुमच्याकडे जुना आयफोन असेल, तर तो एक्सचेंज करून तुम्ही ₹8,000 पर्यंतचा बोनस मिळवू शकता. या दोन्ही ऑफर्सचा पुरेपूर वापर केल्यास आयफोनची किंमत थेट ₹80,490 वर येते. म्हणजेच तुमचे तब्बल 13,000 रुपये वाचू शकतात.
बँक ऑफर्स आणि फ्लाईट व्हॉचर्सही मिळवा
या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये बँकांकडूनही उत्तम फायदे मिळवता येतील. ते कसे? जर तुमच्याकडे HDFC बँकेचे अकाऊंट असेल, तर HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तुमच्याकडे HDFC ऐवजी ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असले, तरी त्यावर 15,000 रुपयांपर्यंतची सूट मिळते. याशिवाय ixigo वरून ऑनलाइन शॉपिंग केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचे फ्लाईट व्हॉचर्सही मिळतील. जे लोक इन-स्टोअर पेटीएम पीओएस ईएमआय (Paytm POS EMI) व्यवहार करतील, त्यांना 5,000 रुपयांपर्यंतचे पेटीएम फ्लाईट व्हॉचर्स दिले जातील.
आयफोन व्यतिरिक्त इतर उत्पादनांवर काय ऑफर्स आहेत?
ॲपल व्यतिरिक्त विजय सेल्सच्या या सेलमध्ये इतर अनेक ब्रँड्सच्या उत्पादनांच्या किमतीही कमी झाल्या आहेत. लॅपटॉप्समध्ये HP, Lenovo आणि Dell सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. तर स्मार्टफोन्समध्ये Samsung, OnePlus, Vivo, OPPO आणि Xiaomi च्या फोन्सवर सूट आहे. तसेच टीव्ही, ऑडिओ उपकरणांसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीही घसरल्या आहेत.











