Bank Jobs : तरुणांसाठी आयुष्य सेटल करण्याची संधी, ₹93,960 पगाराची नोकरी
Bank Jobs : बँकिंग नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी. युनायटेड कमर्शियल बँकेने 2026 च्या सुरुवातीलाच भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मग उशीर कशाला?, पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करू शकता.

युको बँकेत नोकरीची भरती
Bank Jobs : आरामात एसीमध्ये बसून, कामाचा ताण न घेता वेळेवर काम करता येईल अशी नोकरी प्रत्येकाला हवी असते. अशा व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये बँक जॉब्स आघाडीवर आहेत. म्हणूनच अनेक तरुण फक्त बँकेच्या नोकरीची वाट पाहत असतात आणि त्यासाठी खास तयारी करतात. अशा तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. एका बँकेने 2026 च्या सुरुवातीलाच नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. युको बँकेने (United Commercial Bank) 2026-27 वर्षासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) आणि जनरलिस्ट ऑफिसर या विभागांमध्ये एकूण 173 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
युको बँकेत भरण्यात येणारी पदे...
या भरतीद्वारे ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड (JMGS-I) आणि मिडल मॅनेजमेंट ग्रेड (MMGS-II) स्तरावरील खालील पदे भरली जात आहेत.
- ट्रेड फायनान्स ऑफिसर
- ट्रेझरी ऑफिसर
- चार्टर्ड अकाउंटंट
- सॉफ्टवेअर डेव्हलपर
- डेटा अॅनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट
- सायबर सिक्युरिटी ऑफिसर, क्लाउड इंजिनिअर.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
पदवीधर/इंजिनिअरिंग/सीए/एमबीए/एमसीए/एमएस्सी सोबतच इतर काही शैक्षणिक पात्रतेसह युको बँकेत नोकरीची भरती होत आहे. (पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे). तर 20 ते 35 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत. (पदानुसार वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे)
अर्ज शुल्क
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भरावे लागणारे शुल्क तपशील
- SC/ST, दिव्यांग: 175 रुपये (जीएसटीसह)
- इतर (जनरल/OBC/EWS): 800 रुपये (जीएसटीसह)
- शुल्क फक्त ऑनलाइन भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- स्क्रीनिंग
- ग्रुप डिस्कशन
- मुलाखत
- अर्जांच्या संख्येनुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया अवलंबून असेल.
येथे अर्ज करा
पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट uco.bank.in वरील 'करिअर्स' विभागात जाऊन अर्ज करू शकतात. किंवा खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता
https://onlineappl.ucoonline.bank.in/SPE_RCER/
अर्ज स्वीकारण्यास सुरुवात: 14 जानेवारी, 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 फेब्रुवारी, 2026
शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 2 फेब्रुवारी, 2026
पगार किती असणार?
UCO बँकेत पदानुसार पगार असेल. 48,480 रुपयांपासून ते 93,960 रुपयांपर्यंत पगार आहे. सामान्यतः बँक कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर भत्तेही लागू असतील.

