TVS iQube ST vs Ather Rizta S : टीव्हीएस आणि एथरच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. यात आधुनिक तंत्रज्ञानाचे फीचर्स मिळतात. दोन्हीची बॅटरी आणि रेंज जबरदस्त आहे. किंमतीतही दोन्हीमध्ये स्पर्धा आहे. 

TVS iQube ST vs Ather Rizta S : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मागणी खूप वाढली आहे. TVS iQube ST आणि Ather Rizta S या स्कूटर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. दोन्ही कंपन्या एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत. जर तुम्ही या दोन्हींपैकी कोणती स्कूटर घ्यावी याबाबत संभ्रमात असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन्हींपैकी कोणती स्कूटर जास्त पावरफुल आहे आणि कोणाची किंमत जास्त आहे.

Ather Rizta S vs TVS iQube ST बॅटरी तुलना

TVS iQube ST : टीव्हीएस कंपनीने आपल्या iQube ST इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन बॅटरी पर्याय दिले आहेत. या स्कूटरमध्ये BLDC हब माउंट मोटर देखील आहे. ही बॅटरी 4.4 kW पीक पॉवर जनरेट करते आणि 140 nm चा पीक टॉर्क देते. ही स्कूटर IP67 रेटिंगसह येते. यात 3.5kWh ची बॅटरी आहे. या व्हेरियंटला 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. कंपनी या स्कूटरसाठी 145 किमी रेंजचा दावा करते.

Ather Rizta S : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.7kWh ची बॅटरी आहे. या बॅटरीसह, स्कूटरला एका चार्जमध्ये 159 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी साडेचार तास लागतात. या गाडीचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. यात IP66 आणि IP67 रेटिंग असलेली बॅटरी मिळते.

Ather Rizta S vs TVS iQube ST फीचर्स तुलना

TVS iQube ST : या स्कूटरमध्ये 17.79CM फुल कलर TFT टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो. याशिवाय, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, LED हेडलाइट्स, पार्किंग असिस्ट, 32L अंडरसीट स्टोरेज आणि म्युझिक कंट्रोल सिस्टम यांसारखे फीचर्स आहेत.

Ather Rizta S : या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 7-इंच डिस्प्ले, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ESS, टो आणि थेफ्ट अलर्ट, फॉल सेफ, फाइंड माय स्कूटर, OTA अपडेट्स, ऑटो होल्ड, 34L अंडरसीट स्टोरेज आणि फ्रंट स्टोरेज मिळतात.

Ather Rizta S vs TVS iQube ST किंमत तुलना

TVS iQube ST : या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,35,663 रुपये आहे. तथापि, शहर आणि डीलरशिपनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत बदलू शकते. यामध्ये आरटीओ आणि विमा शुल्क वेगळे लागतील.

Ather Rizta S : या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,37,047 रुपये आहे. विमा आणि आरटीओसाठी तुम्हाला वेगळे शुल्क द्यावे लागेल. तथापि, शहर आणि डीलरशिपनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत बदलू शकते.