वाहनप्रेमींसाठी आज नव्या दोन ब्रँड कंपनीच्या कारची माहिती इथे मिळेल.  महिंद्राची नवीन फ्लॅगशिप SUV, XUV7XO, टाटा सफारीला थेट टक्कर देते. चला, पॉवरट्रेन आणि आकारमानाच्या आधारावर या दोन 7-सीटर SUV ची तुलना करूया.

हिंद्राने अलीकडेच कंपनीचे नवीन फ्लॅगशिप ICE मॉडेल, XUV7XO लाँच केले आहे. महिंद्रा XUV7XO म्हणजे मुळात महिंद्रा XUV700 ची एक नवीन आवृत्ती आहे. या SUV चे बुकिंग डिसेंबरमध्ये सुरू झाले होते आणि आता कंपनीने तिची संपूर्ण किंमत सूची जाहीर केली आहे. ही गाडी सहा वेगवेगळ्या ट्रिम पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. इंजिन पर्याय, सीटिंग लेआउट आणि व्हेरिएंटनुसार महिंद्रा XUV7XO ची एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख ते 24.92 लाख रुपयांपर्यंत आहे.

महिंद्रा XUV7XO ही 6-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही SUV टाटा मोटर्सच्या लोकप्रिय SUV, टाटा सफारीच्या सेगमेंटमध्ये येते. या दोन्ही दमदार SUV या सेगमेंटमध्ये एकमेकांना थेट टक्कर देतात. जर तुम्ही प्रीमियम 7-सीटर SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि महिंद्रा XUV7XO व टाटा सफारीमध्ये गोंधळलेले असाल, तर योग्य निर्णय घेण्यासाठी येथे एक छोटी तुलना दिली आहे.

कोणत्या कारमध्ये आहे दमदार पॉवरट्रेन?

महिंद्रा XUV7XO आणि टाटा सफारी या दोन्ही गाड्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही SUV सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सहा-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतात. XUV7XO चे पेट्रोल व्हेरिएंट काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या टाटा सफारीच्या पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. XUV7XO चे डिझेल व्हेरिएंट देखील सफारीच्या डिझेल व्हेरिएंटपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. टॉर्कच्या बाबतीत, XUV7XO चे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन सफारीपेक्षा जास्त टॉर्क निर्माण करतात. XUV7XO ही FWD आणि AWD ड्राइव्हट्रेन पर्यायांसह येते, तर टाटा सफारी फक्त FWD मध्ये येते.

आकारमानात कोणती SUV आहे सर्वोत्तम?

महिंद्रा XUV7XO ही टाटा सफारीपेक्षा 27 मिमी लांब आहे. तर, टाटा सफारी महिंद्राच्या SUV पेक्षा 32 मिमी जास्त रुंद आहे. टाटा सफारीची उंची महिंद्रा XUV7XO पेक्षा 40 मिमी जास्त आहे आणि तिचा व्हीलबेस 9 मिमी लहान आहे.