जर तुम्ही चार लोकांसाठी आरामदायक, चांगली रेंज देणारी आणि दैनंदिन शहरी प्रवासासाठी योग्य इलेक्ट्रिक गाडी शोधत असाल, तर टाटा पंच EV आणि सिट्रोएन eC3 हे दोन उत्तम पर्याय आहेत. पण यातील फरक नेमका काय आहे, तो जाणून घेऊ. 

जर तुम्ही चार लोकांसाठी आरामदायक, चांगली रेंज देणारी आणि दैनंदिन शहरी प्रवासासाठी योग्य इलेक्ट्रिक गाडी शोधत असाल, तर टाटा पंच EV आणि सिट्रोएन eC3 हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत आणि पूर्ण चार्जवर 240 किलोमीटरपेक्षा जास्त रेंजचा दावा करतात. तरीही, या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये फीचर्स, डिझाइन आणि वापरकर्त्याच्या अनुभवामध्ये बरेच फरक आहेत. चला तर मग या दोन गाड्यांमधील फरक नेमका काय आहे, तो जाणून घेऊया.

डिझाइन -

डिझाइनच्या बाबतीत दोन्ही एसयूव्ही एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. पंच EV मध्ये स्मार्ट डिजिटल LED DRLs आणि हेडलाइट्स आहेत. बाकी एसयूव्ही तिच्या सरळ लूक आणि लहान ओव्हरहँगमुळे ICE व्हेरिएंटसारखीच दिसते. सिट्रोएन eC3 स्टँडर्ड C3 सारखीच आहे. तिला स्प्लिट LED DRLs आणि हॅलोजन हेडलाइट्ससह एक वेगळे डिझाइन मिळते. पुढचा बंपर स्पोर्टी दिसतो.

बॅटरी पॅक -

सिट्रोएन इंडिया 29.2 kWh एअर-कूल्ड बॅटरी पॅकसह eC3 ऑफर करते. ही गाडी 246 किलोमीटर (MIDC) रेंजचा दावा करते. तिची इलेक्ट्रिक मोटर 56.88 अश्वशक्ती आणि 143 Nm टॉर्क निर्माण करते. यामुळे या इलेक्ट्रिक एसयूव्हीला ताशी 107 किलोमीटरचा वेग मिळतो.

पंच प्लॅटफॉर्मवर आधारित ही इलेक्ट्रिक गाडी दोन बॅटरी क्षमता पर्यायांसह (25 kWh आणि 35 kWh) येते. यात लिक्विड-कूल्ड बॅटरी पॅक दिला आहे. C75 रेटिंगनुसार, 35 kWh बॅटरी 290 किलोमीटरपर्यंतची वास्तविक रेंज देते आणि तिचे इंजिन 88.77 अश्वशक्ती आणि 190 Nm टॉर्क निर्माण करते. बॅटरी वॉरंटीबद्दल बोलायचे झाल्यास, सिट्रोएन 7 वर्षे किंवा 1.40 लाख किलोमीटरची वॉरंटी देते, तर पंच EV आठ वर्षे किंवा 1.60 लाख किलोमीटरची वॉरंटी देते.

बूट स्पेस -

सिट्रोएन eC3 मध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.2-इंचाची टचस्क्रीन आहे. यात 35 कनेक्टेड फीचर्स आणि इको, स्टँडर्ड असे दोन ड्रायव्हिंग मोड मिळतात. या दोन्ही गाड्या रिजनरेटिव्ह ब्रेकिंग फीचरसह येतात. सामानासाठी यात 315 लिटरची बूट स्पेस दिली आहे.

सुरक्षा आणि फीचर्स -

पंच EV मध्ये दोन 10.24-इंचाचे डिस्प्ले आहेत. यात मल्टी-मोड ब्रेक रिजनरेशनसाठी पॅडल शिफ्टर्स देखील आहेत. तसेच डिजिटल ड्राइव्ह सिलेक्टर नॉब, वायरलेस फोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि इतर अनेक फीचर्स आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंच EV ला भारत NCAP कडून 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर, ग्लोबल NCAP च्या 'सेफ कार्स फॉर इंडिया' मोहिमेत eC3 ला शून्य स्टार मिळाले आहेत.

किंमत -

सिट्रोएन eC3 पाच व्हेरिएंटमध्ये येते. तिची एक्स-शोरूम किंमत 12.90 लाख ते 13.53 लाख रुपये आहे. तर, लहान 25 kWh बॅटरी पॅक असलेल्या पंच EV ची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख ते 14.44 लाख रुपये आहे. ही गाडी 19 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.