cloves benefits : लवंग आरोग्याला खूपच फायदेशील, 'हे' आहेत सात महत्त्वाचे फायदे
लवंग फक्त पदार्थांची चव आणि सुगंधच वाढवत नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. लवंगामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे देखील आढळतात.

लवंगाचे 'हे' सात आरोग्यदायी फायदे -
लवंग फक्त पदार्थांची चव आणि सुगंधच वाढवत नाही, तर तिचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. लवंगामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, डायटरी फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे देखील आढळतात. आहारात लवंगेचा समावेश केल्याने मिळणाऱ्या काही आरोग्यदायी फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
पचनाच्या अनेक समस्या दूर करण्याची क्षमता -
लवंग पचनक्रिया सुधारते, तसेच गॅस, पोट फुगणे आणि ॲसिडिटीपासून आराम देते. पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करत असल्याने, पचनाच्या अनेक समस्या प्रभावीपणे दूर करण्याची क्षमता लवंगामध्ये आहे.
लवंगामध्ये युजेनॉल नावाचे संयुग -
अभ्यासानुसार, लवंग तोंडातील बॅक्टेरियाविरुद्ध अँटीमायक्रोबियल म्हणून काम करते. तोंडातील बॅक्टेरियामुळे होणाऱ्या दातांच्या समस्यांशी लढण्यासाठीच नाही, तर लवंगेचा माउथ फ्रेशनर म्हणूनही वापर करता येतो. लवंगामध्ये युजेनॉल नावाचे संयुग असते, जो लवंग तेलाचा एक महत्त्वाचा घटक आहे.
सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांपासून संरक्षण -
लवंगामध्ये पॉलिफेनॉल म्हणून ओळखले जाणारे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते. शरीराला पोषक तत्वे पुरवून लवंग सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांपासून संरक्षण देऊ शकते.
सततचा खोकला आणि छातीतील दुखण्यावर प्रभावी -
लवंगेच्या वापराने श्वसनमार्गाच्या सूजेची काही लक्षणे कमी करता येतात. काही अभ्यासांनुसार, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी लवंग उपयुक्त ठरू शकते.
लवंग रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत -
शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करत असल्याने लवंग मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. लवंग रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते आणि जेवणानंतर वाढणारी साखर कमी करण्यास मदत करते, हे सिद्ध झाले आहे.
चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासाठी लवंग उपयुक्त -
अँटीऑक्सिडंट्स आणि युजेनॉलमुळे लवंग कोलेस्ट्रॉल, विशेषतः 'खराब' LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करते. त्याच वेळी 'चांगले' HDL वाढवण्यासाठी ती उत्तम आहे. निरोगी आहारात माफक प्रमाणात (दिवसातून 1-2) वापरणे चांगले.