Realme ने भारतात आपली बहुप्रतिक्षित Narzo 90 5G सीरिज लाँच केली आहे, ज्यात Narzo 90 5G आणि Narzo 90x 5G हे दोन मॉडेल्स आहेत. या फोन्समध्ये ७,०००mAh ची अवाढव्य बॅटरी, ६०W फास्ट चार्जिंग आणि ५०MP कॅमेरा यांसारखी दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : स्मार्टफोन क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी Realme ने भारतात आपली बहुप्रतिक्षित Narzo 90 5G ही सीरिज अधिकृतपणे लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Realme Narzo 90 5G आणि Narzo 90x 5G हे दोन दमदार मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. ७,०००mAh ची अवाढव्य बॅटरी आणि ६०W फास्ट चार्जिंग हे या फोन्सचे मुख्य आकर्षण आहे.
किंमत आणि उपलब्धता
Realme Narzo 90 5G: याच्या ६GB+१२८GB व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये, तर ८GB+१२८GB मॉडेलची किंमत १८,४९९ रुपये आहे. हा फोन व्हिक्टरी गोल्ड आणि कार्बन ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.
Realme Narzo 90x 5G: हा बजेट मॉडेल असून याची किंमत १३,९९९ रुपयांपासून (६GB+१२८GB) सुरू होते, तर टॉप मॉडेल १५,४९९ रुपयांना मिळेल. हा फोन नायट्रो ब्लू आणि फ्लॅश ब्लू रंगात मिळेल. हे दोन्ही स्मार्टफोन्स २४ डिसेंबरपासून ॲमेझॉन (Amazon) आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
पाण्याखालीही सुरक्षित! (IP रेटिंग्स)
Realme Narzo 90 5G ला IP66, IP68 आणि IP69 असे तिन्ही रेटिंग्स मिळाले आहेत, ज्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहतो. Narzo 90x 5G मध्ये IP65 रेटिंग देण्यात आले आहे.
दमदार फीचर्स आणि कॅमेरा
१. बॅटरी: दोन्ही फोनमध्ये ७,०००mAh ची टायटन बॅटरी असून ६०W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
२. डिस्प्ले: नार्झो ९० मध्ये ६.५७-इंचाचा AMOLED डिस्प्ले (१२०Hz) आहे, तर ९०x मॉडेलमध्ये ६.८०-इंचाचा मोठा LCD डिस्प्ले (१४४Hz) देण्यात आला आहे.
३. कॅमेरा: नार्झो ९० मध्ये ५०MP चा रिअर आणि ५०MP चाच सेल्फी कॅमेरा आहे. नार्झो ९०x मध्ये ५०MP सोनी IMX852 सेन्सर असून ८MP सेल्फी कॅमेरा आहे.
४. प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६४०० मॅक्स (Narzo 90) आणि डायमेन्सिटी ६३०० (Narzo 90x) चिपसेट वापरण्यात आले आहेत.


